हातकणंगले- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे(choice). हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी यांची मुलाखत झाली आहे. शेतकरी नेते शेट्टी यांनी यावेळी विविध विषयांवर भाष्य केलं. राजू शेट्टी यांनी भाजप किंवा महाआघाडीसोबत न जाता स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारण की चळवळ, यातील काय आवडतं असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर शेट्टी यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिलं आहे.
राजकारण हे खूप गलिच्छ आहे(choice). माझा जीव चळवळीत रमतो, पण दुर्दैव असं आहे की, नुसती चळवळ करुन भागत नाही. राजकारणाशिवाय तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही, जिंकू शकत नाही. निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही. जिथे धोरणं ठरतात, तिथे आपण जाऊ शकत नाही. आपलं म्हणणं मांडू शकत नाही. त्यामुळे इच्छा नसूनही राजकारणात यावं लागतं. राजकारणात यायचं असल्यास गेंड्याची कातडी लागते, असं ते म्हणाले.
शेट्टी पुढे म्हणाले की, गेंड्याची कातडी नसल्यामुळे किंवा २० वर्षांनतर सुद्धा ती कमावता न आल्यामुळे काही आरोप जिव्हारी लागतात. मन दु:खी होतं. पण, शेतकऱ्यांचा कोमजलेला चेहरा आठवतो आणि पुन्हा जोमाने लढायला तयार होतो.
मी निवडणुकीसाठी किंवा राजकारणासाठी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलत नाही. शेतकऱ्यांसाठी राजकारण करतो, हा त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे. मला चळवळीत येऊन ३४ वर्ष झाले. ३४ वर्षांमध्ये मी २२ वर्षांपासून निवडणुका लढवल्या आहेत. माझी पहिली निवडणूक २००२ मध्ये जिल्हा परिषदेची होती. लोकवर्गणीतून निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा होती. माझी ही सहावी निवडणूक आहे. २२ वर्षानंतरही मला लोक वर्गणी देतात. रात्री घरी जाताना मी २-३ लाख रुपये वर्गणी घेऊनच जातो, असं ते म्हणाले.
मुद्दा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा आहे. यात सर्व धर्माचे लोक आहेत. या सगळ्यांचे प्रश्न आहेत. तोट्याची शेती होत आहे, याचे चित्र शेतकऱ्यांसमोर सरळ दिसतं. धर्माच्या नावे लोकांमध्ये ध्रुवीकरण केलं जातं. राजकारणी लोक जाणीवपूर्वक हे करत असतात. शेतकरी शेतात जितके खर्च करतो, तितचे पैसे तरी त्याला मिळायलाच पाहिजे. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. जे काहीच करत नाहीत तेच आरोप करतात, असं ते म्हणाले.
हेही वाचा :
सांगलीत वाऱ्याचं वादळ झालंय; माझा विजय निश्चित… विशाल पाटलांनी व्यक्त केला विश्वास
मिसळ पे चर्चा’ अन् काँग्रेसच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल; काल्हापुरात काय घडलं?
कोल्हापूर-हातकणंगलेत प्रतिष्ठा पणाला, शिंदे मतदारसंघात तळ ठोकून