महाराष्ट्रातील सत्तावर्तुळात सध्या मंत्रिमंडळातील(politics) संभाव्य फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर मंत्रीपद जाण्याची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. कोकाटे यांनी अलीकडच्या काळात केलेल्या काही विधानांमुळे सरकार अडचणीत आलंय. त्यांच्यावर ‘सेल्फ गोल’ केल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदावर गंडांतर आल्याचं सूत्रांचे म्हणणं आहे.

ताज्या चर्चांनुसार, कोकाटे यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीपदी स्थान दिलं जाऊ शकतं. मात्र, या सर्व अंदाजांमध्ये आता एक नवे नाव चर्चेत आलंय, शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(politics) यांनी नुकतीच तानाजी सावंत यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला नवे परिमाण मिळाले. मागील नऊ महिन्यांपासून मंत्रीपदापासून दूर असलेले आणि काहीसे नाराज असलेले सावंत यांच्यासोबत ही एकनाथ शिंदे यांची अचानक भेट ‘सामान्य शिष्टाचार’ मानण्याऐवजी राजकीय घडामोडींचा इशारा मानली जात आहे. या भेटीनंतर सावंत समर्थकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झालंय. मंत्रिमंडळ विस्तारात तानाजी सावंत यांना पुन्हा संधी मिळू शकते, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. भेटीनंतरचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या चर्चेला आणखी बळ मिळालं आहे.
मंत्रिमंडळात तानाजी सावंत यांना स्थान द्यायचं झाल्यास, सध्याच्या मंत्र्यांपैकी कोणाचा पत्ता कट होणार, यावरून आता गोंधळ निर्माण झाला आहे. खास करून शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट यांचं नावदेखील अडचणीत असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी सावंत यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी भेट घेतल्याचं अधिकृत सांगितलं जात असलं, तरी राजकीय दृष्टिकोनातून ही भेट खूप काही सांगून जाते, असं निरीक्षण राजकीय विश्लेषकांचे आहे.
दरम्यान, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लवकरच भेट होण्याची शक्यता आहे. आज दुपारी साडे बारा वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी ही महत्त्वाची भेट होण्याचे संकेत आहेत. यासंदर्भात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास शेतकऱ्यांना घेऊन संपूर्ण राज्यभर आंदोलन उभं केलं जाईल. शेतकरी विरोधाची झळ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला बसू नये, यासाठीही अजित पवार यांच्यासमोर कठीण निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा :
जैन समाजाचे एकत्रित आवाहन – JIO चा बहिष्कार करून माधुरीसाठी न्याय मागा
बारामतीमध्ये भीषण अपघात! डंपर खाली दुचाकी आल्याने तीन जणांचा मृत्यू