पोस्ट ऑफिसकडून सर्वसामान्यांसाठी हटके योजना बाजारात आणत असते. दररोजच्या लहान बचतीमधूनही मुदत पूर्ण झाल्यानंतर चांगली रक्कम होऊ शकते. मध्यमवर्गीयांसाठी अशीच एक धमाकेदार योजना चर्चेत आली आहे. या योजनेत तुम्ही दररोज 300 रुपयांची गुंतवणूक केल्यास मुदत पूर्ण झाल्यानंतर 15 लाख जमा होतील.(Post Office) या योजनेविषयी अधिकची माहिती जाणून घ्या.

पोस्ट ऑफिसची आरडी योजना भरपूर प्रसिद्ध आहे. या योजनेत एकरकमी ठेव जमा करण्याची आवश्यकता नसते. तुम्ही एसआयपीसारख्या सरकारी योजनेत थोडी-थोडी रक्कम गुंतवू शकता. या योजनेबाबत सरकार सुरक्षेची हमी देते.पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेत दररोज करण्यात येणारी छोटी रक्कम भविष्यात मोठ्या निधीत रूपांतरित होते. या योजनेत 6.7 टक्के व्याज मिळते. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सुरुवातीच्या गुंतवणुकीसाठी Post office RD अकाउंट सुरू करू शकता. या योजनेत तुमच्या इच्छेनुसार गुंतवणूक करू शकता. तुम्ही या योजनेत सिंगल किंवा जॉइंट अकाऊंट करू शकता. या योजनेचा मुदतपूर्तीचा कालावधी 5 वर्ष निश्चित करण्यात आला आहे. तुम्ही याजनेची कालावधी 5 वर्षांनी आणखी वाढवू शकता. तुम्ही मुदत वाढवून योजनेतून चांगला परतावा मिळवू शकता.
तुम्हाला रिकरिंग डिपॉजिटमध्ये स्कीममध्ये 15 लाखांची निधी तयार करण्यासाठी दररोज 300 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. (Post Office) यामुळे तुमची महिन्याला 9000 रुपये बचत होईल. तुम्ही 5 वर्ष गुंतवणूक केल्यास तर एकूण निधी 5.4 लाख रुपये इतका होईल. तर त्यात व्याज हे 102291 रुपये इतके असेल. तुम्हाला ठेवीतील रक्कम काढण्याची आवश्यकता नसेल. तर तुम्ही आणखी 5 वर्षांसाठी गुंतवणूक वाढवू शकता. त्यामुळे 10 वर्षात तुमचा निधी 10.80 लाख रुपये इतका होईल. तुम्हाला योजनेतूनच 4.57 लाख रुपये मिळतील. त्यामुळे तुमचा एकूण निधी 1537692 रुपये इतका होईल.
तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत खाते उघडायचे असेल. (Post Office) तर तुम्हाला काही नियम जाणून घेणे गरजेचे आहे. तुम्ही या गुंतवणुकीचा हप्ता वेळेवर भरायला लागेल. तुम्ही हप्ता वेळेवर भरला नाही, तर तुम्हाला दरमहा 1 टक्के दंड भरावे लागेल. तुम्ही सलग 4 हप्ते चुकवल्यास तुमचं आरडी खाते बंद होईल.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?