आषाढी एकादशी हा विठ्ठल-रखुमाईच्या भक्तीने भरलेला आणि उपवासाचा पवित्र सण,(fasting) यंदा 6 जुलै 2025 रोजी एकादशी साजरी केली जाणार आहे. या शुभदिनी उपवास करताना सात्त्विक आणि चविष्ट पदार्थ बनवण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. अशावेळी तुम्ही एक झटपट आणि पौष्टिक राजगिरा खीर १५ मिनिटांत तयार करु शकता.
ही खीर केवळ चवदारच नाही, तर पचायला हलकी आणि पौष्टिक आहे.(fasting) आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तात, विठ्ठल भक्तीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ही खीर नक्कीच खास ठरेल. चला, नोट करा ही सोपी रेसिपी आणि उपवासात घ्या गोड आणि सात्त्विक आनंदाचा अनुभव. राजगिरा खीर बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.

राजगिरा खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
राजगिरा,साखर,तूप,दूध,सुकामेवा,पाणी
राजगिरा खीर बनवण्याची कृती
सर्वात आधी एक कप राजगिरा घ्या त्यात पाणी टाका. नंतर पाणी गाळून घ्यावे. नंतर एका कुकरमध्ये तूप टाका त्यात राजगिरा चांगला भाजून घ्या.नंतर त्यात गरम पाणी टाका (fasting)आणि कुकरचे झाकण लावून ३ शिंट्या करा. नंतर ४ कप दूध मिसळा. सुकामेवा टाकून चांगले शिजवा नंतर साखर मिसळा. राजगिऱ्याची खीर तयार आहे.
हेही वाचा :
भारतातील ‘या’ राज्यावर 6 जुलैला विनाशकारी संकट? नागरिकांकडे वाचण्यासाठी फक्त 2 दिवसांचा वेळ!
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 8 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार
Volkswagen Cars वर छप्परफाड डिस्काउंट, तब्बल 2.5 लाखांची सूट