उन्हाळ्याच्या हिटला करा बीट; घरीच बनवा झटपट ‘थंडगार मँगो लस्सी’

उन्हाळा सुरु झाला की सर्वात आधी(Mango) आठवतो तो आंबा आणि थंडगार पेय. आंब्याचा गोडवा आणि दह्याचा थंडपणा यांचा एकत्रीकरण असलेली ही लस्सी केवळ चविष्टच नाही, तर शरीरालाही थंडावा देते. घरच्या घरी सहज तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला उन्हाळ्याच्या कडाक्यापासून आराम देईल. लगेच लिहून घ्या.

मँगो लस्सी बनवण्यासाठीचे साहित्य
पिकलेला आंबा – १ मोठा
साखर – चवीनुसार
दही – १ कप थंड
दूध – अर्धा कप ऐच्छिक
वेलदोड्याची पूड – १ चिमूट (Mango)ऐच्छिक
बर्फाचे तुकडे – ४ ते ५
सुकामेवा सजावटीसाठी ऐच्छिक – कापलेले बदाम, पिस्ते, काजू

मँगो लस्सी बनवण्याची कृती
सर्वप्रथम कापलेला आंबा, दही, साखर आणि दूध मिक्सरमध्ये घ्या.
त्यात वेलदोड्याची पूड आणि बर्फाचे तुकडे टाका.
सर्व साहित्य एकत्रित गार आणि गुळगुळीत होईपर्यंत मिक्स करा.
तयार लस्सी ग्लासमध्ये ओता.
वरून थोडा सुकामेवा टाका आणि(Mango) थंड सर्व्ह करा.

टीप
तुमच्या आवडीनुसार लस्सी अजून गोडसर हवी असेल तर त्यात गरजेनुसार साखर तुम्ही घालू शकता.लस्सी बनवताना दूध वापरेल पाहिजे असे नाही, फक्त दह्यापासून बनवलेली लस्सीदेखील चविष्ट होते.ही लस्सी उन्हाळ्यात थंडावा देणारी आणि पोषणमूल्यांनी भरलेली आहे.

हेही वाचा :

‘तारक मेहता’मधील अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

अक्षय्य तृतीयेपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा; सोन्याच्या दरवाढीत ब्रेक

IPL 2025 मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट, राजस्थान रॉयल्सला BCCI चा फुल सपोर्ट