६ जुलैपासून पंतप्रधान मोदींचा तीन देशांचा दौरा ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणावर भारताचा विशेष भर?

भारताचे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या महत्त्वाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. (Narendra Modi) परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी या ६ दिवसीय दौऱ्याची अधिकृत घोषणा केली. हा दौरा ६ जुलैपासून सुरू होऊन ११ जुलै रोजी न्यूझीलंडमध्ये संपणार आहे.

या दौऱ्याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पूर्व) रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितले की, मॉरिशस, सेशेल्स आणि नुकताच जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाईची यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर, आता भारताचे लक्ष प्रामुख्याने हिंदी महासागराच्या पूर्व सागरी क्षेत्रावर आणि ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणावर केंद्रित झाले आहे. ‘ॲक्ट ईस्ट’ हे भारत सरकारचे एक प्रमुख परराष्ट्र धोरण आहे. आशिया-पॅसिफिक आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील देशांशी भारताचे आर्थिक, धोरणात्मक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणे हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

६ जुलै रोजी इंडोनेशिया पंतप्रधानांच्या दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियातून होईल. जकार्तामधील मुख्य बैठकांव्यतिरिक्त ते योग्याकर्ता येथील ऐतिहासिक प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देतील. या युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या संवर्धनासाठी भारत आणि इंडोनेशिया एकत्र काम करत आहेत. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो २०२५ च्या प्रजासत्ताक दिनी भारताचे मुख्य अतिथी होते, (Narendra Modi) तेव्हापासून सुरू झालेल्या चर्चेला या दौऱ्यात गती मिळेल.पंतप्रधान मोदी ८ जुलै रोजी मेलबर्नमध्ये दाखल होतील. येथे ते तिसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील आणि ऑस्ट्रेलियन कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतील. तसेच ते ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडलाही भेट देणार आहेत.

११ जुलै रोजी न्यूझीलंड दौऱ्याचा शेवटचा टप्पा ठरणार ऐतिहासिक पाऊल हा दौरा विशेष ऐतिहासिक मानला जात आहे, कारण तब्बल ४० वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान न्यूझीलंडला भेट देत आहेत. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी या दौऱ्याचे स्वागत करताना म्हटले, “हा दौरा ऐतिहासिक असून दोन्ही देशांमधील वाढते संबंध दर्शवतो. ही भागीदारी दोन्ही देशांच्या समृद्धी आणि सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरेल.” पंतप्रधान मोदी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. (Narendra Modi)यामध्ये पुढील प्रमुख मुद्द्यांवर भर असेल. त्यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक यासाठी एप्रिलमध्ये न्यूझीलंडसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारावर पुढील चर्चा होईल.

ऑस्ट्रेलियासोबत संरक्षण सहकार्य, सायबर सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स महत्त्वाची खनिजे आणि सप्लाय चेन यावर चर्चा होईल. क्वाड (Quad) समूहाचा भाग म्हणून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि स्थिरता राखण्यावर भर दिला जाईल. अयोध्येनंतर आता बद्रीनाथ धाम चर्चेत; देणगी चोरीच्या आरोपांनंतर चौकशीचे आदेश या तिन्ही देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक राहतात. इंडोनेशियात सुमारे १.४ लाख, न्यूझीलंडमध्ये ३ लाख आणि ऑस्ट्रेलियात तब्बल ९.७ लाख भारतीय वंशाचे लोक आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी तिन्ही देशांमध्ये भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?

पीएफ खातेधारकांसाठी नवीन नियम, पेन्शनबाबतही मोठे बदल?

धाड धाड कोसळले तेलाचे भाव, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती थेट?