हातकणंगले तालुक्यातील जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र बाहुबली येथील महामस्तकाभिषेक साेहळ्यासाठी ९ काेटी रुपये तर पवित्र तीर्थक्षेत्र कुंथुगिरी येथील भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहाेत्सवासाठी ९.२० काेटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. याकामी आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

या संदर्भात बुधवारी श्री क्षेत्र बाहुबली कुंभाेज व श्री क्षेत्र कुंथुगिरी आळते येथील तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडली. (Bahubali) यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गाेरे, राज्यमंत्री याेगेश कदम, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मुख्य सचिव, नियाेजन विभाग तसेच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्यासह बाबासाे चाैगुले, डी. सी. पाटील, सुधीर पाटील आदी उपस्थित हाेते. आमदार राहुल आवाडे, विभागीय आयुक्त पुणे, काेल्हापूर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिसीद्वारे उपस्थित हाेते. कुंभाेज येथील अतिशय क्षेत्र बाहुबली येथे दर १२ वर्षांनी भव्य असा महामस्तकाभिषेक साेहळा संपन्न हाेताे. यंदा आगामी जानेवारी मध्ये हा साेहळा हाेत असून या पार्श्वभूमीवर परिसरातील विविध पायाभूत सुविधा व विकासकामांसाठी शासनाकडून ९ काेटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक महामस्तकाभिषेक साेहळ्यासाठी देश-विदेशातून लाखाेंच्या संख्येने भाविक व पर्यटक बाहुबली येथे येत असतात. भाविकांची माेठी गर्दी लक्षात घेता याठिकाणी रस्ते, वीज, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, भक्तनिवास आणि परिसराचे सुशाेभीकरण यासारख्या मूलभूत सुविधा उभारणे आवश्यक असते. या साेहळ्याचे नियाेजन नेटके व्हावे आणि भाविकांची काेणतीही गैरसाेय हाेऊ नये, (Bahubali) यासाठी आमदार आवाडे यांनी राज्य शासनाकडे विशेष निधीची मागणी केली हाेती. शासनाने त्याची सकारात्मक दखल घेत ९ काेटींच्या विकासकामांना प्रशासकीय व वित्तीय मंजुरी दिली आहे. आळते येथील श्री क्षेत्र कुंथुगिरी येथे होणाऱ्या भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहाेत्सव व पूजेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील विविध विकासकामांसाठी शासनाकडून ९.२० काेटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी शासनाने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
कुंथुगिरी येथील पंचकल्याणक पूजेसाठी राज्यभरातून तसेच देश-विदेशातून माेठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येणार आहेत. अभ्यागत भाविकांना सर्व आवश्यक साेयी-सुविधा मिळाव्यात यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांनी शासनाकडे विशेष निधीची मागणी केली हाेती. (Bahubali) त्या माध्यमातून परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, पथदिवे आणि इतर पायाभूत सुविधांसह परिसराच्या सुशाेभीकरणाची कामे मार्गी लागणार आहेत. तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून स्थानिक धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, या उद्देशाने आमदार राहुल आवाडे यांनी शासन स्तरावर विशेष प्रयत्न केले हाेते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने जैन समाजासह स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा :
देशातील जनता वाढत्या महागाईने त्रस्त सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ, अनावश्यक खर्चात कपात
सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे महेंद्र लाड उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील
वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू बेलकडे-अलिबाग मार्गावरील घटना