काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर(challenge) डिबेटचे आव्हान स्वीकारले आहे. माजी न्यायमूर्तींच्या पत्राला पोहोच देत राहुल गांधी यांनी मोदींशी वादविवाद करण्याची जाहीर तयारी दर्शवली आहे. शिवाय पीएम मोदी यासाठी तयार होतात का? केव्हा तयार होतात ते कळवा, असंही राहुल गांधी यांनी न्यायमूर्तींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर चर्चेस आव्हान(challenge) स्वीकारल्यास आपण चर्चेचं स्वरुप ठरवूयात. मी किंवा आमचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी कोणीही चर्चेला येऊ, असा निरोप राहुल गांधी यांनी पाठवला आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रस्तावाला प्रतिसाद मिळतो का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
माजी न्यायमूर्ती मदन लोकुर,अजित शाहा व पत्रकार एन राम यांच्याकडून चर्चेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीवेळी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांमध्ये जाहीर चर्चा केली जाते.
त्याच धर्तीवर भारतात पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या दोन नेत्यांची जाहीर डिबेट आयोजित करण्याचा माजी न्यायमूर्तींचा मानस आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी आव्हान स्वीकारलं, पण नरेंद्र मोदी या चर्चेसाठी कधी तयार होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा :
मोदी सरकार चले जाव! 17 मे रोजी महाविकास आघाडीची अतिभव्य सभा
नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास देशातील लोकशाही संपणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात
‘मुख्यमंत्र्यांची अखेरची फडफड, शिंदे, अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही’, संजय राऊतांचा टोला