रेल्वेचा मोठा निर्णय! RailOne अ‍ॅप लाँच; काय सुविधा मिळणार?

रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम (CRIS)च्या ४० व्या(anniversary) वर्धापनदिनानिमित्त रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली जाती. त्यांनी RailOne या नवीन ॲपची सुरुवात केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना अजून एका अॅपवर सर्व सुविधा मिळणार आहे. रेल वन हे अॅप रेल्वे आणि प्रवासी यांच्यातील संवाद सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

हे अॅप्लिकेशन खूप अपग्रेडेड असणार आहे.(anniversary) यामध्ये युजर्ससाठी अनुकूल इंटरफेस असणार आहे. हा अॅप अँड्रोइड प्ले स्टोअर आणि IOS अॅप स्टोअरवरुन डाउनलोड करता येणार आहे. या एकाच अॅपमध्ये तुम्हाला सर्व सुविधा एकत्र मिळणार आहे.

फक्त सिलिंडर, लायटरच नाही… तर ट्रेनमध्ये ‘हे’ फळ नेण्यास देखील आहे बंदी
काय सुविधा मिळणार?

लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

तक्रार निवारण

ई कॅटरिंग, पोर्टर बुकिंग

आरक्षित तिकीट बुकिंग

जनरल तिकिट बुकिंग

प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग

मंथली तिकीट पास

PNR स्टेट्‍स चेक करता येणार

ऑनलाइन फूड ऑर्डर करता येणार

आयआरसीटीसीवर (IRCTC)तुम्हाला तिकीट बुक करता येणार आहे.(anniversary) आयआरसीटीसोबत भागीदारी केलेल्या इतर अॅपप्रमाणेच रेलवन अॅपलाही आयआरसीटीसीने अधिकृत केले आहे.

RailOne मध्ये mPIN किंवा बायोमेट्रिकद्वारे लॉगिनसह सिंगल-साइन-ऑनची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे. याचसोबत अपग्रेडेड RailConnect आणि UTS देखील संलग्न आहे.

Railway e Wallet ची सुविधा

यामध्ये तुम्हाला रेल्वे-ई-वॉलेट सुविधा मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला तिकीट बुक करताना कोणताही अडथळा येणार नाही. तसेच न्यू युजर्सला लगेचच रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..