गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे(holidays) जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे. कोल्हापूर शहरासह करवीर आणि शिरोळ तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना प्रशासनाने आज सुट्टी जाहीर केली आहे. पूरस्थितीमुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे ते बंद करण्यात आले आहेत, ज्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे धरणं ओव्हर फ्लो झाली असून, या धरणांमधून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात(holidays) पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पूरस्थितीमुळे ११ राज्य आणि ३७ प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले होते, ज्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. सध्या काही ठिकाणी पूराचे पाणी ओसरले असले तरी काही भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे.
कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर शिरोळ तालुक्यातील ९ शाळांत निवारा केंद्र सुरू केल्याने या शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात पावसाने सध्या विश्रांती घेतली असून, शहर परिसरात घुसलेलं पावसाचं पाणी ओसरले आहे. पंचगंगेवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४६.०५ फुटांवर आली आहे. परंतु, पन्हाळा गडावरील रेडे घाट परिसरात दरड कोसळल्यामुळे पन्हाळा-कोल्हापूर रस्ता बंद झाला होता. काल सायंकाळी पन्हाळा नगरपरिषद प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर कोसळलेली दरड बाजूला करत रहदारीसाठी रस्ता सुरू केला आहे. अशा परिस्थितीत, नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
हेही वाचा :
‘गुलाबी साडी’ गाण्यामागची कहाणी: संजू राठोडने सांगितली यशाची कथा
बहिणींना पैसे नको, सुरक्षा हवी! काँग्रेसने शिंदे आणि फडणवीसांवर साधला निशाणा
शिवसेना नेत्याच्या मुलाचा विरारमधील रिसॉर्टमध्ये रहस्यमय मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद