डिजिटल मीडियाला अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी अपार मेहनत घेणारे आणि महाराष्ट्रातील डिजिटल(digital media) पत्रकारितेचे खरे आधारस्तंभ, सन्माननीय श्री. राजा माने साहेब नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आले. महाराष्ट्र सरकारकडून डिजिटल मीडियाला अधिकृत मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर, श्री. माने साहेबांचा हा कोल्हापूर दौरा विशेष महत्त्वाचा ठरला.
या दौऱ्यादरम्यान, टीम कोल्हापूर आणि इचलकरंजी तर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन भरघोस स्वागत करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांच्या या यशस्वी लढ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा विशेष सन्मान केला. डिजिटल माध्यमांचे हक्क आणि ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेले अथक प्रयत्न आणि प्रामाणिक धडपड यामुळेच आज डिजिटल मीडियालाही(digital media) सरकारदरबारी मान्यता प्राप्त झाली आहे.

राजा माने साहेबांनी चर्चा करत असताना सांगितले की, “डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींना त्यांचा योग्य हक्क आणि प्रतिष्ठा मिळावी, हीच माझी प्राथमिकता होती. आज हे यश संपूर्ण महाराष्ट्रातील डिजिटल पत्रकारितेच्या बांधवांचे आहे.” या प्रसंगी अनेक डिजिटल मीडिया प्रतिनिधी, स्थानिक पत्रकार उपस्थित होते.
हा दौरा केवळ स्वागतापुरता मर्यादित नसून, येणाऱ्या काळात डिजिटल मीडियाच्या अधिक बळकट आणि सशक्त भविष्यासाठी दिशा देणारा ठरणार आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
हेही वाचा :