शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी आक्रमक; रक्ताचे पाट वाहतील पण…

पुणे: राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गाची(Highway) घोषणा केल्यापासून राज्यभरातून या महामार्गाला विरोध वाढू लागला आहे. नागपूर -गोवा या 805 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारने भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली. पण रक्ताचे पाट वाहिले तरी चालेल पण शक्तीपीठ महामार्गाचे भू-संपादन होऊ देणार नाही, अशी भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे. ते पुण्यात बोलत होते.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तिसऱ्या आघाडीची तयारी सुरू आहे. या तिसऱ्या आघाडीची पुण्यात बैठक होणार आहे. या निमित्त राजू शेट्टी पुण्यात आले आहेत असता त्यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “शक्तिपीठ महामार्गाला(Highway) स्थगिती देण्याच्या घोषणा झाल्या होत्या. त्यापूर्वी महामार्गाचा एकूण खर्च, डीपीआर काय आहे,हे समजून घेण्यासाठी पत्र दिले. त्याचं उत्तर आले.

या महामार्गासाठी जवळपास 86 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे यात मोबदला दिला जाणार आहे, पण यात कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे यात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. रक्ताचे पाट वाहतील पण भूसंपादन होऊ देणार नाही, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. राज्यात निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. पण निवडणुका कधी होणार याबाबत निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगितले आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याचा अंदाज आहे. असे राजू शेट्टी यांनी नमुद केले.

याचवेळी त्यांनी एक देश एक निवडणूक या निर्णयावरह भाष्य केलं आहे. ” एक देश एक निवडणूक या निर्णयावर आमचा विश्वास नाही. हा निर्णय झालाच तर 2029 नंतरच याची अंमलबजावणी करावी लागेल. पण लोकसभा निवडणुका झाल्या आणि चार महिन्यात सरकार कोसळले तर निवडणुका परत घेणार का, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. तसेच, ही ब्रह्मिक कल्पना आहे, हा विषय व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये चालणारा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा:

मद्यप्रेमींसाठी खूषखबर, सरकारचा निर्णय नेमका काय?

नो इलेक्शनच्या तयारीसाठी ONOE चा प्लॅन; मोदींचं अर्थशास्त्र काढत राऊत गरजले

प्रत्येक अग्निवीराला Permanent Job, महिलांना दरमहा 2100 रुपये…, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

आईवरून शिवीगाळ केली, छतावर लटकलेल्या अवस्थेत सापडलं बॉसचं मुंडकं!