लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट ₹1500 की ₹3000, कोणत्या महिन्याचा हप्ता झाला जमा?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर जुलै महिन्याच्या सन्मान निधीच्या वितरणाची प्रोसेस सुरू करण्यात आली आहे. (women) त्यामुळे महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार की ३००० रुपये याबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

राज्य सरकारकडून सध्या फक्त जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता वितरित केला जात आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकाचवेळी जमा होतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, सध्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नसून पात्र महिलांना जुलै महिन्याचेच १५०० रुपये मिळणार आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रोसेस सुरू झाली आहे. पुढच्या २ ते ३ दिवसांत पात्र लाभार्थी महिलांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात हा निधी जमा होणार आहे. (women) त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्यातील शिल्लक तपासण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

लाडकी बहिण योजनेचा लाभ राज्यातल्या तब्बल १ कोटी ६६ लाख महिलांना मिळणार आहे. पुणे, सोलापूर, बीडसह विविध जिल्ह्यांतल्या काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेजही आले आहेत. निधी टप्प्याटप्प्याने खात्यांमध्ये जमा केला जाणार आहे. दरम्यान, अर्जांची छाननी आणि e-KYC प्रोसेसनंतर ९२ लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. (women) त्यामुळे योजनेच्या नियमांची पूर्तता करणाऱ्या पात्र महिलांनाच सध्याचा हप्ता मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं तर, सध्या ३००० रुपये नाही तर जुलै महिन्याचे १५०० रुपये खात्यात जमा होणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबतची स्वतंत्र माहिती सरकारकडून जाहीर झाल्यानंतरच त्याची रक्कम स्पष्ट होईल.

हेही वाचा :

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?

नशामुक्त सांगलीसाठी संकल्प करा?