अभिनेता राम कपूर सध्या ‘लॉक अप 2’ या शोमुळे चर्चेत आहे.(abhineta) नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्याने फार मोठं सत्य सांगितलं आहे. ते सांगताना अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी देखील आहे. राम म्हणाला ‘मी माझ्या वडिलांच्या मृत्यूची पूर्व योजना आखली होती…’, सांगायचं झालं तर अभिनेत्याचे वडील कॅन्सरशी झुंज देत होते, त्यांनी या गंभीर आजारावर मात देखील केली. पण वयाच्या 73 व्या वर्षी त्यांना पुन्हा कॅन्सरचं निदान झालं. अशात त्यांनी आजारावर उपचार घ्यायचे नव्हते… अशा परिस्थितीत वडिलांच्या एका फोननंतर असं काही झालं, ज्यानंतर राम कपूर याच्या आईने आणि बहिणीने अभिनेत्यासोबत असलेले सर्व संबंध मोडले.राम कपूर म्हणाला, ‘कोरोना काळात माझ्या वडिलांना पुन्हा कॅन्सरचं निदान झालं. त्यांनी गौतमीला फोन केला आणि तिला सांगितलं मला रामशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे.

फोनवर वडिलांसोबत माझी चर्चा झाली आणि खरं तर, त्यांनी ठरवलं होतं की, आता त्यांना या गंभीर आजाराशी लढायचं नाही. त्यांना या जगाचा निरोप घ्यायचा होता.अभिनेता पुढे म्हणाला, ‘पण त्यांना एकट्यांना कोणता मोठा निर्णय घेण्यास भीती वाटत होती. कोणाच माहिती पडू नये, अशीच त्यांची इच्छा होती,(abhineta) पण त्यांना मी त्यांच्याजवळ हवा होतो… त्यामुळे मला त्यांना स्पष्ट विचारलं की, ‘तू माझी मदत करणार आहेस का? ते मला म्हणाले, ‘तू माझी मदत केली नाही तर, मी स्वतःच मोठं पाऊल उचलेल…‘वडिलांनी असं म्हटल्यानंतर माझ्याकडे कोणता दुसरा पर्याय राहिला नाही… त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं
तेव्हा मी देखील त्यांच्यासोबत होतो. त्यांना ICU मध्ये दाखल तर केलं, पण कोणालाच माहिती नव्हतं की, त्यांच्यावर कोणते उपचार सुरु नाहीत…’, वडिलांच्या निधनानंतर राम कपूर यांच्या आईने आणि बहिणीने त्यांच्यासोबत असलेले सर्व संबंध संपवले.अभिनेता म्हणाला, ‘पाच वर्षांपेक्षा जास्त दिवस झाले असतील, प्रत्येक जण राजा सारखा जगत आहे. (abhineta) पण ते तर एखाद्या राजाप्रमाणेच गेले… त्यांच्यामुळे आज मला मृत्यूची भीती राहिलेली नाही.’, सांगायचं झालं तर, ‘लॉकअप 2 ‘ मध्ये राम कपूर त्याच्या खासगी आयु्ष्याबद्दल फार मोठे खुलासे करताना दिसत आहे.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?