तुम्हालाही स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, पण तुमचे बजेट कमी आहे,(smartphone) तर आता तुम्ही उत्तम फीचर्स असलेला फोन खरेदी करू शकता. तर Realme ने तुमच्यासाठी Narzo 80 Lite 4G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची खास गोष्ट म्हणजे कमी बजेटमध्ये लाँच झाला आहे. चला तर मग जाणून घेऊयात या फोनचे खास फिचर्स आणि किंमत.
6300mAh बॅटरीसह Realme Narzo 80 Lite 4G लाँच, मोटोरोला-विवोला देणार टक्कर

Realme Narzo 80 Lite 4G ची किंमत
या फोनच्या 4 जीबी/64 जीबी व्हेरिएंटची किंमत 7,299 रुपये आहे, (smartphone)परंतु लाँच ऑफर्स अंतर्गत, तुम्ही 700 रुपयांच्या कूपन डिस्काउंटचा फायदा घेऊन हा हँडसेट 6,599 रुपयांना खरेदी करू शकता. त्याचवेळी, 6 जीबी/128 जीबी असलेल्या या फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 8,299 रुपये आहे, जर तुम्ही हा फोन खरेदी केला तर तुम्हाला 700 रुपयांची कूपन डिस्काउंट मिळेल, त्यानंतर तुम्हाला हा फोन 7,599 रुपयांना मिळेल.
Realme Narzo 80 Lite 4G ची फिचर्स
डिस्प्ले: या फोनमध्ये 6.67 इंचाचा एचडी प्लस एलसीडी स्क्रीन आहे जो 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो.
चिपसेट: हा हँडसेट 1.8 GHz Unisoc T7250 ऑक्टा कोर प्रोसेसरने (smartphone)सुसज्ज आहे, तसेच चांगल्या ग्राफिक्ससाठी Mali G57 MP1 GPU देखील आहे.
बॅटरी: 15W फास्ट चार्ज सपोर्टसह, या Realme स्मार्टफोनमध्ये 6W रिव्हर्स वायर्ड चार्ज सपोर्ट देखील आहे.
रॅम: फोनमध्ये 4 जीबी आणि 6 जीबी रॅम असला तरी, हा फोन 12जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह येतो. याचा अर्थ असा की या बजेट फोनमध्ये तुम्हाला 18 जीबी पर्यंत रॅम सपोर्ट मिळेल.
कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा आणि समोर 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर असेल.
हेही वाचा :
Maruti Suzuki XL6 च्या बेस व्हेरिएंटची सहज मिळेल चावी, किती करावा लागेल डाउन पेमेंट?
हरिद्वारला फिरायला जाताय? तर तेथील ‘या’ प्रसिद्ध मंदिरांना द्या भेट
आजचा पहिला श्रावणी शनिवार राशी ठरणार भाग्यशाली! शनिदेवांचा आशीर्वाद आयुष्य बदलणार, आजचे राशीभविष्य वाचा