सांगली जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी विक्रमी ३५१ उमेदवारी अर्ज

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागासाठी विक्रमी ३५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आमदार इद्रिस नायकवडी, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, (Bank) जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी प्रमुख नेत्यांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले. उद्या शुक्रवारी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. अखेरच्या दिवशी तब्बल १४७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने विविध गटातून तब्बल विक्रमी म्हणजे ३५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या छाननी झाल्यानंतर वैध उमेदवार निश्‍चित होणार आहेत.

आज अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी कवठे महांकाळ तालुक्यातील विकास सोसायटी गटातून उमेदवारी दाखल केली आहे. (Bank) तसेच त्यांच्या स्नूषा प्रियंतिका घोरपडे यांनीही उमदेवारी दाखल केली आर्हे. याशिवाय जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी कवठेमहांकाळ विकास सोसायटी गटातून उमेदवारी दाखल केली आहे. उमेदवारी दाखल केलेल्या प्रमुख नेत्यामध्ये माजी आमदार विक्रमसिंह सावंत, सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुजयनाना शिंदे, सिकंदर जमादार, माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, गौरव नायकवडी, देवराज पाटील, मालन मोहिते, विट्याचे वैभव पाटील, माजी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम, आण्णासाहेब कोरे आदींचा समावेश आहे.

जिल्हा बॅकेच्या निवडणूक मैदानात आजी-माजी खासदार, चार विद्यमान आमदार, जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष, एक माजी राज्यमंत्री, जिल्हा परिषदेचे तीन माजी अध्यक्ष, दोन माजी महापौर रिंगणात उतरले आहेत. एकीकडे जिल्हा बँकेची निवडणूक अविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असताना (Bank) अनेक दिग्गज मैदानात उतरल्याने चुरस वाढली आहे. उमेदवारी अर्जाची छाननी उद्या होणार असून छाननीनंतर वैध उमेदवार समोर येणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत २१ ऑक्टोंबर असल्याने चर्चेसाठी मोठा अवधी मिळणार असून या कालावधीत कोण माघार घेणार याकडे आता लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी अ गटातील म्हणजे विकास सोसायटी गटातून ७७८ मतदार आहेत. तर एकूण मतदार संख्या २ हजार ४४५ आहे. सर्वाधिक मतदार वाळवा तालुक्यात ५८४ असून त्या पाठोपाठ मिरज तालुक्यातील मतदार संख्या ४५१ आहे.

हेही वाचा : 

बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती

शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी

धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार