Rekha ने 19 वर्षे लहान ‘या’ स्टार किडच्या ओठांवर केलं होतं KISS; फोटो व्हायरल झाला आणि…

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा गेल्या अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीवर(Entertainment news) राज्य करतायत. गेल्या काही वर्षांपासून ती कोणत्याही चित्रपटात दिसल्या नसल्या तरी ती बॉलिवूडच्या पार्ट्या आणि कार्यक्रमांना उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

रेखा यांच्या आयुष्याशी अनेक वाद जोडले गेले. अभिनेत्री रेखा यांच्या एका वादग्रस्त किसबद्दलचा हा किस्सा आहे. त्यांनी आपल्या वयापेक्षा 19 वर्षांनी लहान असलेल्या स्टार किडला चुकून किस केले होते. या लिपलॉकवरून रेखा यांचे नाव बरेच वादात होते आणि त्यांच्यावर टीकाही झाली होती. तो अभिनेता कोण होता आणि ही घटना कधी घडली? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

रेखाकडून मोठी चूक
70 ते 80 च्या दशकात सतत यशस्वी चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री रेखा(Entertainment news) यांचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी राहिलेले नाही. पण रेखाच्या चुंबनाचा उल्लेख केला जातोय ते कोणत्याही चित्रपटातील दृश्य नाही तर प्रत्यक्षात घडलेली एक विचित्र घटना आहे. रेखा एका अवॉर्ड शोमध्ये पोहोचतात आणि तिथे ती एक मोठी चूक करतात.

खरंतर आपण ज्या स्टार किडबद्दल बोलतोय तो दुसरा तिसरा कोणी नसून सुपरस्टार हृतिक रोशन होता. जेव्हा रेखा आणि हृतिक या अवॉर्ड शोमध्ये एकमेकांना भेटले तेव्हा एकमेकांना शुभेच्छा देताना रेखाने हृतिकचे चुंबन घेतले, जे हृतिकच्या ओठांभोवती होते.

या क्षणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यूजर्सनी अभिनेत्री रेखाला जोरदार ट्रोल केले. दुसऱ्या कोनातून फोटो पाहता रेखाचे चुंबन हृतिकच्या हनुवटीवर असल्याचे दिसून येते. पण हा किसिंग सीन वाद रेखाच्या कारकिर्दीत खूप चर्चेत राहिलाय.

रेखा आणि हृतिकचे नाते
रेखा आणि हृतिक रोशन यांनी अनेक चित्रपटांमध्ये(Entertainment news) एकत्र काम केलंय. ज्यात हृतिकचे वडील राकेश रोशन दिग्दर्शित क्रिश फ्रँचायझीच्या चित्रपटांचा समावेश आहे. ‘कोई मिल गया’ या चित्रपटात रेखाने हृतिकच्या आईची भूमिका केली होती. ‘क्रिश’मध्ये असताना त्या त्याच्या आजीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. अशाप्रकारे रेखा यांचे ऑनस्क्रीन आई आणि आजीची भूमिका करून हृतिकशी एक वेगळे नाते आहे. रेखा क्रिश 4 मध्येही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसू शकतात, असेही वृत्त समोर येतंय.

शारीरिक संबंधांबद्दल विधान
रेखा यांच्या लव्ह लाईफबद्दल सर्वांना माहिती आहे. रेखाच्या लग्नाबद्दल आणि प्रेम जीवनाबद्दल अनेक कहाण्या सांगितल्या जातात. एकदा रेखा यांनी लग्न आणि शारीरिक संबंधांवर असे विधान केले होते की त्या वेळी सर्वांनाच धक्का बसला आणि एकच गोंधळ उडाला.

खरं तर, यासर उस्मान यांच्या ‘रेखा: व्हॉट वॉज माय फर्स्ट लाईफ’ या पुस्तकात रेखा यांनी शारीरिक संबंधांबद्दल केलेल्या विधानाचा उल्लेख आहे. हो, रेखाने स्वतः एकदा एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘जर तुमचे कोणाशी शारीरिक संबंध नसतील तर तुम्ही त्यांच्या जवळ येऊ शकत नाही. रेखा म्हणाल्या, ‘जिथे प्रेम असते तिथे नाते असते.’ लग्नाच्या पहिल्या रात्री पहिले शारीरिक संबंध होतील अशी अपेक्षा करणे हास्यास्पद आहे. हे मूर्खपणाचे आहे’, असेही त्यांनी म्हटले होते.

रेखा आणि इम्रान खान यांच्यातील नात्याबाबत एका जुन्या मुलाखतीत काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. इम्रान खान यांनी 1992 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधारपद स्वीकारले आणि त्यांच्या देशाला विश्वचषक जिंकून दिला. या काळात इम्रान खानला भारतातही खूप पसंती मिळाली. इम्रान खानचे बॉलिवूड सुंदरींसोबतचे अफेअर देखील चर्चेत असायचे. इम्रान खान यांना भारत दौऱ्यात रेखा यांच्यासोबत अनेकदा पाहिले गेले.

रेखा आणि इम्रान खान एकमेकांवर खूप प्रेम करतात अशा बातम्याही आल्या होत्या. दोघांनी जवळजवळ १ महिना एकत्र घालवला. 1985 मध्ये रेखा आणि इम्रान खान यांच्या लग्नाच्या बातम्याही वर्तमानपत्रांमध्ये येऊ लागल्या. आजही त्या वर्तमानपत्रातील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नंतर रेखा आणि इम्रान वेगळे झाले. रेखा व्यतिरिक्त, इमरान खानचे बॉलिवूड सुपरस्टार झीनत अमानसोबतचे नातेही खूप चर्चेत होते.

हेही वाचा :