केस आणि त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी(health) महिला सतत काहींना काही करत असतात. कधी केसांची काळजी घेण्यासाठी हेअरमास्क लावला जातो तर कधी त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारचे हेअरमास्क आणून लावले जातात. मात्र वारंवार चुकीचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्वचा आणि केसांची गुणवत्ता काहीशी खराब होऊन जाते.
दिवसभरात जेवलेल्या अन्नपदार्थांचा शरीरावर(health) थेट परिणाम दिसून येतो. त्यामुळे आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे नियमित सेवन करावे. कायम निरोगी आणि तरुण त्वचेसाठी शरीराला हायड्रेशनची जास्त आवश्यकता असते. शरीरात निर्माण झालेल्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता शरीरास आवश्यक असलेल्या पोषक घटकांचे सेवन करणे गरजेचे आहे.
आपल्यातील अनेकांना सकाळी उठल्यानंतर वेगवेगळ्या पेयांचे सेवन करण्याची सवय असते. यामध्ये हळदीचे पाणी, मेथीच्या दाण्यांचे पाणी किंवा चिया सीड्सचे सेवन केले जाते. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. शरीरात(health) साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कोणत्या मॉर्निंग ड्रिंकचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या ड्रिंकच्या सेवनामुळे त्वचा आणि केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
मॉर्निंग ड्रिंक बनवण्याची कृती:
सकाळी उठल्यानंतर नियमित चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरासह त्वचेला अनेक फायदे होतात. एक ग्लासात पाण्यात अर्धा चमचा चिया सीड्स घालून प्यायल्यास शरीर स्वच्छ होण्यासोबतच वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, अँटी-ऑक्सिडंट्स, प्रथिने, जस्त आणि तांबे इत्यादी अनेक घटक आढळून येतात. या पाण्यात असलेल्या पोषक घटकांमुळे केसांचे आरोग्य सुधारते. केसांची ताकद वाढून केस गळतीच्या समस्येपासून कायमचा आराम मिळतो. चिया सीड्समध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स केसांचे नुकसान होऊ देत नाहीत. त्यामुळे नियमित सकाळी उठल्यानंतर चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन करावे.
हळदीच्या पाण्याचे सेवन:
केस आणि त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी नियमित हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. हळदीचे पाणी आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. हळदीमध्ये असलेल्या क्यूमिनमुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय शरीर डिटॉक्स करण्यासाठी हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी हळदीचे पाणी प्रभावी ठरते. याशिवाय यामध्ये असलेले घटक त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा :