पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी (traffic) करण्यासाठी वाहतूक विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गंगाधाम चौक परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अखेर वाहतूक शाखेला कडक पावलं उचलावी लागली आहेत. 1 जुलै 2025 पासून कात्रज-कोंढवा रस्ता आणि टिळेकर चौक मार्गावर जड आणि अवजड वाहनांना 24 तास ‘नो एन्ट्री’ आदेश लागू करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावरील उतारामुळे ट्रक आणि डंपरसारख्या जड वाहनांचे नियंत्रण सुटल्याने गंभीर अपघात होत होते. यातीलच एक दुर्दैवी घटना 11 जून रोजी घडली होती, (traffic)ज्यामध्ये एका भरधाव ट्रकच्या धडकेत दीपाली सोनी या दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कोणत्या मार्गांवर नो एन्ट्री? :
– शत्रुंजय मंदिर कान्हा हॉटेल ते गंगाधाम चौक
– टिळेकर चौक ते गंगाधाम चौक
– या दोन्ही मार्गांवर जड वाहनांना 24 तास पूर्णतः प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
तसेच, खालील मार्गांवर सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत नो एन्ट्री लागू राहील:
– लुल्लानगर कोंढवा ते गंगाधाम चौक ते चंद्रलोक हॉस्पिटल चौक
– गंगाधाम चौक ते वखार महामंडळ चौक ते सेव्हन लव्ह्ज चौक
या निर्णयामुळे सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळात होणारी वाहतूक कोंडी कमी होईल, अशी वाहतूक शाखेची अपेक्षा आहे. ट्रक, डंपर, मिक्सर आणि कंटेनर यांसारख्या अवजड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई होणार आहे. पुणे वाहतूक विभागाने घेतलेला हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. (traffic)केवळ अपघातांचे प्रमाणच नव्हे, तर या मार्गांवरील प्रवासही आता अधिक सुकर होणार आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर..
SL vs BAN सामना थांबवला, मॅचमध्ये आला खास पाहुणा! मैदानावर गोंधळ, नक्की कारण काय?
वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान