ऋषभ पंतने जडेजाच्या निवृत्तीवर उडवली खिल्ली, सोशल मिडीयावर Video Viral

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे भारताच्या संघाचा इंग्लंडविरुद्ध पहिला चांगला पार पडला यामध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरा त्यांना दोन जुलैपासून सुरू होणार आहे. रोहित शर्माचे निवृत्तीनंतर(retirement) भारताचा संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. टीम इंडियाने मागील दोन वर्षांमध्ये रोहित शर्माचे नेतृत्वाखाली दोन आयसीसी ट्रॉफी नावावर केल्या. 2024 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारताच्या संघाने फायनलचा सामना जिंकून 11 वर्षानंतर t20 चषक दुसऱ्यांदा जिंकला.

या विजयाला आता एक वर्ष 29 जून रोजी पूर्ण झाले या वर्ल्डकप चा आनंद साजरा करण्यासाठी बीसीसी आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासाठी बर्मिंगहॅममध्ये उपस्थित असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी एक खास सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशन दरम्यान, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अष्टपैलू रवींद्र जडेजासोबत मजा करताना दिसला. सेलिब्रेशनसोबतच पंतने अचानक जडेजाच्या निवृत्तीबद्दल(retirement) बोलायला सुरुवात केली, त्यानंतर जडेजाने असे उत्तर दिले की तिथे उपस्थित असलेला कोणताही खेळाडू हसू आवरू शकला नाही. सोशल मीडियावर टीम इंडियाच्या चाहत्यांनाही हा व्हिडिओ आवडला आहे.

२९ जून २०२४ रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने १३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले. इंग्लंड दौऱ्यावर उपस्थित असलेल्या खेळाडूंनी या प्रसंगाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद साजरा केला. या उत्सवादरम्यान ऋषभ पंतने रवींद्र जडेजाला केक खायला दिला आणि निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. हे ऐकताच जडेजाने लगेच सांगितले की त्याने फक्त एकाच फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. हे ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेला प्रत्येक खेळाडू जोरजोरात हसायला लागला.

२०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर, भारताच्या ३ महान खेळाडूंनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी अंतिम सामना जिंकल्यानंतर ही घोषणा केली. कोहली आणि रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर कसोटीतूनही निवृत्ती घेतली आहे, परंतु जडेजा अजूनही एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचा भाग आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत तो टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..

बाप आहे की हैवान ! बाळाला रस्त्याच्या मधोमध फेकले अन्…; हृदय पिळटवून टाकणारा Video Viral