दणक्यात झालं रोहित शर्माचं बर्थडे सेलिब्रेशन, मुंबई इंडियन्सने शेअर केला Video

भारतीय क्रिकेटच्या वनडे आणि टेस्ट संघाचा कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) 30 एप्रिल रोजी त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने वर्ल्ड कप 2024 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या आयसीसी स्पर्धा जिंकल्या. तर रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले.

सध्या मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवलं गेलं असलं तरी रोहित शर्मा(Rohit Sharma) त्याच्या विस्फोटक फलंदाजीने आजही आयपीएलचं मैदान गाजवतोय. गुरुवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार असून यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ हा जयपूरमध्ये आहे. त्यामुळे जयपूरमध्येच रोहित शर्माच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यात आले, याचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे.

जयपूरच्या हॉटेलमध्ये रोहित शर्माच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी रोहितची पत्नी रितिका सजदेह आणि मुंबई इंडियन्सचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सुद्धा उपस्थित होते. वाढदिवसा करता खास केक मागवण्यात आला होता ज्यावर रोहित शर्माचे फोटो सुद्धा होते. रोहित शर्माने केक कापला, यावेळी इतर खेळाडूंनी त्याच्या सोबत धम्माल सेलिब्रेशन केलं. खेळाडूंनी यावेळी रोहितच्या चेहऱ्यावर केक सुद्धा लावला.

रोहित शर्माने जून 2007 मध्ये रोहितने भारताकडून वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रोहितने आतापर्यंत वनडेत 273 सामने खेळले असून यात 11168 धावा केल्या आहेत. तर 67 टेस्टमध्ये 4302 धावा तर 159 टी 20 सामन्यात त्याने 4231 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने वर्ल्ड कप 2024 विजयानंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहित शर्माने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक रेकॉर्डस् आपल्या नावे केले आहेत.

रोहित शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत 266 सामने खेळले असून यात त्याने 6868 धावा केल्या आहेत. यासह रोहितने स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत आतापर्यंत 15 विकेट सुद्धा घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये रोहितच्या नावावर 45 अर्धशतक तर 2 शतकांचा समावेश आहे. विस्फोटक फलंदाजी करताना रोहितने आयपीएलमध्ये एकूण 297 षटकार तर 617 चौकार ठोकले आहेत. 2009 च्या आयपीएल सीजनमध्ये रोहित शर्माने डेक्कन चार्जेस कडून गोलंदाजी करताना मुंबई इंडियन्स विरुद्ध विकेटची हॅट्रिक सुद्धा घेतली होती.

हेही वाचा :

१ मे पासून देशातील ‘या’ १५ बँका होणार बंद?, जाणून घ्या

मनोज जरांगे पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; उपोषणाची तारीख ठरली

शरद पवारांचा नरेंद्र मोदींना पाठिंबा, केलं मोठं वक्तव्य