भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा तूफान चर्चेत असलेले नाव आहे. रोहित शर्मा याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. रोहित शर्मा याच्यावर आता विराट कोहली याचे चाहते तूफान भडकले आहेत. (cricketer) त्यांच्याकडून व्हिडीओही शेअर केला जातोय.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू अर्थात रोहित शर्मा लवकरच टेलिव्हिजनच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे. रोहित शर्मा याचा शो प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सोनी टीव्हीवर फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा हा गेमिंग शो प्रेक्षकांच्या भेटीला येईल. रोहितचा एक वेगळा अंदाज बघायला मिळेल. रोहित शर्मा याच्या या शोकडे लोकांच्या नजरा आहेत. (cricketer) चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, या शोपूर्वीच रोहित शर्मा तूफान अडचणीत सापडला आहे. रोहित शर्मा याच्यावर आरोप केले जात आहेत. फक्त आरोपच नाही तर रोहित शर्मा याला खोटारडे देखील म्हटले जातंय. प्रोमोच्या शोमध्ये रोहित शर्मा जुन्या गोष्टींना उजाळा देताना दिसतोय. शिखर धवन आणि शोचा होस्ट मनीष पॉल यांच्यासमोर रोहित शर्मा जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. 2014-15 मध्ये झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या किस्सा सांगताना दिसला.
रोहित शर्मा सांगतो की, गोलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाज स्टीव्ह स्मिथ याच्यासोबत बाचाबाची झाली.(cricketer) यावेळी शिखर धवन हा माझ्या मदतीला धावून आला. तो ठामपणे त्यांच्याविरोधात उभा राहिला. हा प्रोमो तूफान व्हायरल होत आहे. मात्र, विराट कोहली याचे चाहते संताप व्यक्त करत आहेत. रोहित शर्मा जो किस्सा सांगत आहे तो त्याचा किस्सा नसून विराट कोहली याचा असल्याचे चाहते सांगत आहेत. ही घटना विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या घडली. यादरम्यान विराटच्या चाहत्यांकडून या किस्स्याचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केली जात आहेत. रोहित शर्मा खोटारडा असल्याचे अनेकांनी म्हटले.आमच्याकडे व्हिडीओ आहे, रोहित खोटे बोलत असल्याचे विराटच्या चाहत्यांनी म्हटले. रोहित शर्मा नक्की पुढे काय बोलतो हे कळेल. सध्या त्याचा प्रोमोच व्हायरल झाला. त्यावरच विराट कोहली याचे चाहते पेटून उठल्याचे बघायला मिळतंय. रोहित शर्मा याचा हा शो नक्की काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पण पहिल्याच प्रोमोमध्ये शो वादात अडकला. या शोमध्ये रोहित शर्मा नक्की काय काय खुलासे करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. 19 सप्टेंबरपासून सोनी टीव्हीवर हा शो प्रसारित होईल. या शोमध्ये असे काही मोठे खुलासे करताना रोहित शर्मा दिसेल.
हेही वाचा :
माधुरी वनतारामधून निघाली शुक्रवारी पहाटेपर्यंत नांदणीत पोहचणार?
LPG गॅस बुकिंगचा नियम बदलला जाणून घ्या नवीन नियम?
एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असावीत, जास्त खात्याने काय समस्या येऊ शकते ?