सर्वसाधारणपणे एलपीजी गॅस सिलेंडर हा १४.२ किलोचा असतो. सर्व ग्राहक हे याच वजनाचा गॅस सिलेंडर वापरत असतात. (gas cylinder) मात्र एक असा वर्ग देखील आहे जो ५ किलोचा छोटू एलपीजी गॅस सिलेंडर देखील वापरतात. या ग्राहकांसाठी इंडियन ऑईलच्या छोटू एलपीजी सिलेंडर हा एक चांगला पर्याय आहे. या सिलेंडरची अनेक वैशिष्ठे आहेत. मात्र याबाबत अनेक लोकांना फार माहिती नाहीये.

विशेष म्हणजे या सिलेंडरसाठी कोणत्याही अॅड्रेस प्रुफची गरज लागत नाही. (gas cylinder) त्याचबरोबर ग्राहकांना प्रती सिलेंडर ५०० रूपयांपर्यंत बाय बॅक रक्कम देखील मिळते. हे सिलेंडर खासकरून विद्यार्थी, भाड्याने राहणारे लोक, दुसऱ्या शहरात काम करणारे कर्मचारी, छोटे कुटुंबीय, हॉस्टेल, छोटे दुकानदार आणि कमी जागेत व्यावसायिक उपयोग करणारे लोक वापरतात.इंडियनऑयलचा ‘छोटू’ आणि एचपीसीएलची नवी एलपीजी सेवा इंडियनऑयलने ५ किलोग्राम वजनाचा एफटीएल सिलेंडर ‘छोटू’ या नावाने लाँच केला आहे.
ज्या लोकांना कमी प्रमाणात गॅसची आवश्यकता असते, त्यांच्यासाठी हा सिलेंडर तयार करण्यात आला आहे. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार या सिलेंडरचा वापर कोणत्याही शहरात करू शकतात. भविष्यात याची गरज न राहिल्यास, अधिकृत विक्री केंद्रातून खरेदी केलेला हा सिलेंडर परत केल्यावर प्रति सिलेंडर ५०० रुपयांची निश्चित बायबैक (परतावा) रक्कम दिली जाते.विशेष म्हणजे, हा सिलेंडर खरेदी करण्यासाठी कोणत्याही पारंपरिक घरगुती गॅस कनेक्शनची गरज भासत नाही. ग्राहक केवळ ओळखपत्र दाखवून नवीन ‘छोटू’ एलपीजी कनेक्शन घेऊ शकतात. (gas cylinder) त्यानंतर देशभरातील कोणत्याही अधिकृत इंडेन डिस्ट्रीब्यूटर, इंडियनऑयल पेट्रोल पंप, निवडक किराना स्टोअर्स किंवा सुपरमार्केटमधून या सिलेंडरची रिफिलिंग करता येते.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?