ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशीबदलाचा आणि (zodiac) त्यांच्या परस्पर दृष्टीयोगाचा प्रत्येक राशीच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. जुलै २०२६ च्या उत्तरार्धात असा एक महत्त्वाचा ग्रहयोग तयार होत असून, १९ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता शनि आणि मंगळ यांच्यात ६० अंशांचा शुभ ‘लाभ दृष्टी योग’ निर्माण होणार आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या मते, हा योग काही राशींसाठी प्रगती, आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो.

या ग्रहयोगाचा सर्वाधिक प्रभाव मेष, वृश्चिक, मकर आणि कुंभ राशींवर दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मेष राशीच्या व्यक्तींना रखडलेली कामे पूर्ण होण्याची संधी मिळू शकते. (zodiac) नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळण्याबरोबरच नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकते. तसेच पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक वातावरणही सकारात्मक राहू शकते.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या लाभदायक मानला जात आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होण्याची शक्यता असून, अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरीत पगारवाढ किंवा पदोन्नतीचे संकेत आहेत, (zodiac) तर व्यवसाय करणाऱ्यांना विस्ताराच्या नव्या संधी मिळू शकतात. त्यामुळे आर्थिक स्थैर्याबरोबरच मानसिक समाधानही वाढण्याची शक्यता आहे.
मकर राशीच्या व्यक्तींसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरू शकतो. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यापारी आणि उद्योजकांना नवीन व्यावसायिक करार मिळू शकतात, तर नोकरी करणाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रगतीची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कुंभ राशीच्या व्यक्तींनाही या ग्रहयोगाचा सकारात्मक लाभ मिळू शकतो. कार्यक्षेत्रात सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊन उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच कुटुंबातील मतभेद दूर होऊन घरात आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण होऊ शकते.
हेही वाचा :
पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?