अंतराळातून परतल्यानंतर शुभांशू शुक्ला यांची काय अवस्था झाली पाहा; VIDEO व्हायरल

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ(space) स्थानकात 18 दिवस वास्तव्य केल्यानंतर 15 जुलैला पृथ्वीवर परतले आहेत. दरम्यान पृथ्वीवर परतल्यानंतर आता शुभांशू शुक्ला पुन्हा एकदा चालण्यास शिकत आहेत. 25 जून रोजी अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानात प्रवास करणाऱ्या चार क्रू सदस्यांमध्ये शुक्ला यांचा समावेश होता.

मंगळवारी शुभांशू शुक्ला यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ते पुन्हा चालण्याचा आणि गुरुत्वाकर्षणाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडीओत त्यांना चालताना संघर्ष करावा लागत असून, दोन व्यक्ती चालण्यास मदत करत अस्लयाचं दिसत आहे.

“माझी प्रकृती आणि लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा देणारे बरेच संदेश मिळाले आहेत. मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो आणि अपडेट देखील देऊ इच्छितो. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेत असताना, आपल्या शरीरात द्रवपदार्थ बदलणे, हृदय गती, संतुलन पुनर्संचयित करणे, मसल लॉस यासारखे अनेक बदल होतात. नवीन वातावरणाशी जुळवून घेणं सुरु आहे.

एकदा शरीराला याची सवय झाली आणि आपण गुरुत्वाकर्षणाकडे परतलो की, पुन्हा गोष्टी सुरळीत होतात. प्रत्येक अंतराळवीरांसाठी(space) हे बदल वेगळे असले तरी, शरीर वातावरणाशी जुळवून घेण्यास लवकर सुरुवात करतं. आपलं शरीर नवीन परिस्थितींशी ज्या गतीने जुळवून घेतं ते पाहून मला आश्चर्य वाटत आहे,” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

“अज्ञात जागेच्या (अंतराळ) शोधात, तुम्हाला स्वतःबद्दल अधिक जाणून घेता येते,” असं त्यांनी पुढे म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हवाल्याने एका अधिकृत निवेदनात देण्यात आलेल्या माहितीनुसार, शुक्ला आणि इतर तीन मिशन अंतराळवीर वैद्यकीय आणि पुनर्अनुकूलन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 23 जुलैपर्यंत क्वारंटाइनमध्ये राहतील.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत, जितेंद्र सिंह यांनी सांगितलं आहे की अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात शुक्ला यांच्या तीन आठवड्यांच्या वास्तव्यामुळे भारताला गगनयान प्रकल्पाची तयारी करण्यात मदत मिळेल. यामुळे भारताच्या भविष्यातील प्रवासांसाठी प्रचंड अनुभव प्राप्त झाला असून, मोठ्या आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी देशाला चांगल्या स्थितीत आणलं असल्याचं सांगितलं आहे.

“सर्वात महत्त्वाचं म्हणजे, भारताने संपूर्ण जगभरात एक संदेश पाठवला आहे की, भारतही आता अंतराळ क्षेत्रात स्पर्धात्कम टप्प्यावर आला आहे,” असंही ते म्हणाले.

आयएसएसमध्ये असताना, शुक्ला आणि अ‍ॅक्स-4 क्रू यांनी 60 हून अधिक वैज्ञानिक प्रयोग आणि प्रचार उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. शुक्ला अवकाशात जाणारे दुसरे भारतीय आहेत. 1984 मध्ये विंग कमांडर राकेश शर्मा अशी कामगिरी करणारे पहिले भारतीय होते.

हेही वाचा :

नीता अंबानींची अनोखी साडी, तयार करण्यासाठी लागले तब्बल 10 महिने!

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट लाल भोपळ्याचे भरीत, पावसाळ्यात पचनासाठी ठरेल अतिशय हलका पदार्थ

काळेकुट्ट ढग, ताशी 30-40 किमी वेगानं वादळी वारे; 24 तासांत पावसाचं हे रुप भीती वाढवणार