खळबळजनक घटना! हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण, बेदम मारहाण करून पुलावर फेकले video viral

धाराशिव जिल्ह्यातील नेहमी चर्चेत असलेले हॉटेल भाग्यश्रीचे मालक(owner)नागेश मडके यांच्यावर बुधवारी २३ जुलै सायंकाळी अपहरण आणि मारहाणीचा धक्कादायक प्रकार घडला. चारचाकी गाडीतून आलेल्या पाच अज्ञात आरोपींनी त्यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केली आणि शेवटी वडगाव सि. येथील पुलावर फेकून दिले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.सायंकाळी साडेसातच्या सुमारास नागेश मडके हे त्यांच्या हॉटेल भाग्यश्रीसमोर उभे होते, त्याचवेळी चारचाकी गाडीतून आलेल्या पाच जणांनी सेल्फी काढण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ येत गाडीत जबरदस्तीने ओढले. त्यानंतर त्या गाडीने त्यांना थेट धाराशिवकडे नेले. गाडीतच या पाच जणांनी नागेश मडके यांना अमानुष मारहाण केली, असा आरोप मडके यांनी केलाय.

मडके यांचा दावा आहे की अपहरणकर्त्यांनी त्यांना जीवाने मारण्याचा डाव रचला होता. मारहाणीनंतर पाचही आरोपींनी त्यांना वडगाव सि. येथील पुलावर फेकून दिले. गंभीर अवस्थेत असतानाही मडके यांनी त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून माहिती दिली. कुटुंबीयांनी तातडीने पोहोचून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.सध्या नागेश मडके जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. (owner)मात्र पोलिसांकडून अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसला तरी, लवकरच गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती मडके यांनी दिली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस तपास सुरू आहे.

महिन्याभरापूर्वी हॉटेल भाग्यश्रीवर काही अज्ञातांनी पोस्टर फाडून हल्ला केला होता. गेल्या आठवड्यातही हाणामारीची घटना घडली होती. सोशल मीडियावर या हॉटेलची खूप प्रसिद्धी असून जेवणासाठी येथे मोठी गर्दी असते. हॉटेलला बाऊन्सरही तैनात करण्यात आले आहेत.(owner) मात्र, इतक्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरही हॉटेल मालकावर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.दरम्यान, सदर प्रकरणामागे व्यक्तिगत वैर, व्यावसायिक स्पर्धा किंवा कुठली तरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या CCTV फुटेज, मोबाइल लोकेशन आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांवरून तपासाला वेग दिला आहे. धाराशिवसारख्या ठिकाणी दिवसा अपहरण व मारहाण यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.

हेही वाचा :

नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग झटपट बनवा डाळिंब्यांची उसळ, श्रावणातील पारंपरिक रेसिपी

मुंबईहून गोवा अवघ्या १२ तासांत पोहचा.., भारतात पहिल्यांदाच सुरु होणार फेरी सेवा

नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमच्या पोटाचं आरोग्य राहिल निरोगी जाणून घ्या फायदे