शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

तत्कालीन मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांनी गरिबांसाठी अल्प दरात शिवभोजन थाळी सुरु केली होती.(paid) हि योजना आजही सुरु आहे. मात्र राज्यभरातील शिव भोजन थाळी संचालकांना मागील सहा महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. जवळजवळ शंभर ते सव्वाशे कोटी रुपये थकलेले असल्याचे सांगण्यात येत असून अनुदान न मिळाल्यामुळे शिवभोजन थाळी संचालक अडचणी सापडले आहेत.

आजच्या महागाईत गरिब मजूर, कामगारांना कमी दरात भोजन मिळावं, यासाठी १० रुपयात भोजन देण्याची योजना उद्धव ठाकरे सरकारच्या काळात सुरु करण्यात आली होती. हि योजना पुढे महायुती सरकारच्या काळात देखील सुरु ठेवण्यात आली आहे. (paid)अर्थात यासाठी ठिकठिकाणी सुरु करण्यात आलेला शिवभोजन थाळी केंद्र चालकांना सरकारकडून अनुदान स्वरूपात रक्कम दिली जात होती. मात्र आता हि अनुदानाची रक्कम केंद्र चालकांना मिळत नसल्याची चित्र आहे.

राज्यभरात जवळपास ५ हजार शिवभजन थाळी केंद्र आहेत. कोणीही उपाशी राहू नये यासाठी दहा रुपयात जेवण देण्याची योजना राज्यात राबवली जात आहे. मात्र जानेवारी महिन्यापासून केंद्र चालकांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. अर्थात पैसे न मिळाल्यामुळे आता शिवभजन थाळी कशी चालवायची असा प्रश्न संचालकांना पडला आहे. (paid)तर शिवभोजन थाळी चालवताना कामगारांचा पगार, लागणाऱ्या अन्नधान्य असो या सगळ्या गोष्टी अडचणीच्या ठरत आहे.

दरम्यान राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे शिवभोजन थाळीचे अनुदान रखडले का? असाही प्रश्न आता शिवभोजन चालवणारे संचालक विचारू लागले आहे. तर शहरातील काही रुग्णालयासमोर शिवभोजन थाळी ही बाहेर जाऊन येणाऱ्या रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भार न पडता उपयोगी ठरते. मात्र पुढच्या काळात हे चालवणे कठीण होणार असल्याचे शिवभोजन थाळीचे संचालकाने सांगितलं.

हेही वाचा :

रोहित शर्माने वनडे क्रिकेटमधूनही घेतली निवृत्ती?

क्रिकेट विश्वात शोककळा, माजी भारतीय फिरकी गोलंदाजाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

राज्यात पावसाचा इशारा, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज