एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर (suffers)महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण युवा सेना अधिकारी प्रतिक पाटील सह सात पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. कल्याण-पक्षात सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण युवा सेना अधिकारी प्रतिक पाटील सह सात पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठविल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे.

युवा सेना जिल्हा प्रमुख प्रतिक पाटील हे २००७ साली भारतीय विद्यार्थी सेनेचे शाखा संघटक होते. त्यानंतर युवा सेनेच्या स्थापनेनंतर उपविभाग अधिकाी होते. त्यानंतर तालुका अधिकारी होते.(suffers) २०२२ सालापासून पाटील हे युवा सेना जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत होते. विविध पदावर कार्यरत असलेल्या पाटील यांनी वेळोवेळी पक्षाच्या विविध आंदोलन मोर्चे यात सक्रीय सहभाग घेतला. २००९ सालापासून २०२४ सालापर्यंत झालेल्या विविध निवडणूकीत पक्षाचे काम केले. पक्षाचे काम करीत असताना माझ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ले ही झाले. न डगमगता पाटील यांनी पक्षाचे काम निष्ठेने केले.

२००२ साली पक्ष फूटीनंतरही माझी निष्ठा कायम राहिली. (suffers)पक्ष बांधणीसाठी कल्याण लोकसभा मतदार संघात काम केले आहे, असे असताना २०२४ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीनंतर पक्षाकडून मला सातत्याने सापत्न वागणूक मिळाली. संघटनेतील गटबाजीमुळे माझी सातत्याने निराशा झाली. निष्ठेने काम करुनही आमच्या प्रयत्नांना न्याय मिळाला नाही. माझ्यासह माझ्या सहकारी वर्गासोबतही भेदभाव होत गेला. अशा परिस्थिती पक्षाचे काम करणे शक्य नाही. पक्षातील गटबाजी, सापत्न वागणूकीला कंटाळून पक्ष पदाचा राजीनामा पाटील यांनी दिला आहे. राजीनामा त्यांनी पक्षाचे युवा नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे दिला आहे. पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी परेश काळण, पंकज माळी, भावेश गायकर, प्रसाद टुकरुल आणि पायल शिंगोटे यांनी देखील पक्ष पदाचे राजीनामे दिले आहेत.
हेही वाचा :
नीता अंबानींची अनोखी साडी, तयार करण्यासाठी लागले तब्बल 10 महिने!
अंतराळातून परतल्यानंतर शुभांशू शुक्ला यांची काय अवस्था झाली पाहा; VIDEO व्हायरल
बॉलिवूडच्या प्रसिद्ध रॅपरचा भीषण कार अपघात; चालत्या कारमधून फेकला गेला, व्हिडीओ व्हायरल