कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोणतेही कोणतेही संयुक्तिक कारण नसताना, अगदी अचानक हमास या दहशतवादी संघटनेने तीन वर्षापूर्वी निद्राधीन असलेल्या इस्राईलवर शेकडो क्षेपणास्त्रांचा मारा करून युद्धाला(World War) तोंड फोडले. इस्रायल ने केलेल्या जोरदार प्रति हल्ल्यात गाझापट्ट बेचिराख झाली. हजारो इमारती धाराशयी पडल्या. हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. लक्षावधी लोक बेघर झाले.

मध्य पूर्व भागातील काही देश या युद्धात इस्राईल विरोधात उतरले आणि आता तर इसराइल/ इराण युद्धाने उग्र रूप धारण केल्याने मध्यपूर्वेतील सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. भूकबळी, हवेतील प्रदूषणाने धोक्यात आलेले सार्वजनिक आरोग्य, पसरलेली रोगराई, महिला आणि मुलांचे होत असलेले अतोनात हाल, अशा प्रकारे मानवी जीवनच विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेल्या या युद्धातून नेमकं काय साध्य करायचे आहे या प्रश्नाने शांतता प्रिया देश हैराण झाले आहेत.
इसराइल, पॅलेस्टाईन, लेबनॉन, सीरिया, इराण, या देशांमध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे. इसराइल विरोधात हे मध्यप्रदेश एकवटले आहेत.सिरीयामध्ये सत्तांतर झाल्यामुळे सध्या हा देश बाजूला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या(World War) वेळी झालेली ज्यू लोकांची झालेली वाताहत लक्षात घेऊन पुन्हा अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून इसराइल मोठ्या निर्धाराने, निश्चयाने या युद्धात पूर्ण ताकतीनिशी उतरला आहे.
काल-परवापर्यंत इराण हा या युद्धापासून अलिप्त होता, मात्र पॅलेस्टाईन, लेबनॉन या देशांना सर्व प्रकारची रसद इसराइल विरोधात पुरवत होता. पण त्याचबरोबर आपला अणू कार्यक्रमही पुढे नेत होता. याच दरम्यान अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील काही देशांशी संपर्क साधून, संवाद प्रस्थापित करून शांततेचे आवाहन केले होते मात्र त्याचवेळी ट्रम्प यांनी इसरायला विश्वासात घेतलेले नव्हते. पण तरीही इस्रायलने त्याची पर्वा केलेली नव्हती.
चार दिवसापूर्वी इस्रायलने अतिशय नियोजन पूर्वक, मोसाद या गुप्तहेर संघटनेकडून मिळालेल्या अचूक माहितीचा उपयोग करून इराणवर नेमक्या ठिकाणी क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. अणु कार्यक्रम उध्वस्त करण्याचा तो प्रयत्न होता. इराणचे लष्कर प्रमुख तसेच अन्य महत्त्वाच्या नेत्यांना इस्रायलने अचूक टिपले.
इस्रायल मे इराण वर केलेला हा सर्वात मोठा जीवित हानी करणारा, लष्कराची हानी करणारा हल्ला होता. त्यानंतर इराण ने इस्रायलच्या प्रमुख शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. तेल अविव या शहरातील अनेक इमारतींची पडझड झाली. या हल्ल्यामुळे इस्राईलच्या हवाई सुरक्षा प्रणाली बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांची ही सुरक्षा प्रणाली पुरेशा प्रमाणात प्रभावी नसल्याचे सिद्ध झाले आहे.
इराणने आपला अणु कार्यक्रम थांबवावा असे अमेरिकेने यापूर्वी अनेक वेळा आवाहन केले होते, इतकेच नाही तर अनेक निर्बंधही लादले होते. पण इराणने अमेरिकेला अपेक्षित असलेला प्रतिसाद दिला नाही. मात्र आता इराणच्या अणु कार्यक्रमाला इस्रायलने लक्ष्य केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प महाशयांना आनंद होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे इस्रायल ला बेदखल करणे आता अमेरिकेला परवडणारे नाही. इस्रायलच्या बेंजामिन नेत्यांनाहू यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांना”तुमच्याशिवाय”असा संदेश दिला आहे. एकूणच इसराइल आणि इराण यांच्यातील युद्ध(World War) चांगलेच भडकले असून, अनेक देशांना त्याचा फटका प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बसणार आहे.

इराणने आपला न्यूक्लियर कार्यक्रम सुरूच ठेवला, तो अण्वस्त्रधारी बनला तर त्याचे बरे वाईट परिणाम मध्यपूर्वेत आणि शेजारच्या प्रदेशातही होणार आहेत. इराणचा अणू कार्यक्रम आपल्या देशासाठी मारक आहे आणि म्हणूनच इराणच्या गंडस्थळावर म्हणजेच न्यूक्लियर कार्यक्रमावर हल्ला करून तो उध्वस्त करण्याचे डावपेच इस्राईल च्या अधिकाऱ्यांनी
आखले होते आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही झालेले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या खोमेनीराजवटीला अण्वस्त्र कार्यक्रम थांबवण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही तर कायमची अद्दल घडवण्यासाठी अमेरिका या युद्धात उतरेल असा सज्जड दम त्यांनी दिला आहे.
इराण मध्ये काही प्रमुख शहरात भारतीय मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या निमित्ताने आहेत. सुमारे 10 हजार भारतीयांना अझरबैजान, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान रस्ता मार्गाने भारतात आणले जाणार आहे. त्याचे नियोजन परराष्ट्र मंत्रालयाकडून सुरू आहे.
इकडे मध्यपूर्वेत युद्धाचा(World War) भडका उडाला आहे आणि तिकडे रशिया आणि युक्रेन मधील युद्ध थांबायला तयार नाही. इसराइल विरुद्ध इराणच्या संघर्षात अमेरिकेने इस्राईलच्या बाजूने उतरण्याची धमकी दिली आहे. तर युक्रेन च्या बाजूने नाटो राष्ट्रांनी युद्धात उतरण्याची तयारी केली किंवा युक्रेनला सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरूच ठेवला तर युद्धाची व्याप्ती वाढणार आहे. कदाचित ती तिसऱ्या महायुद्धाची चाहूल ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
कोल्हापुरात काँग्रेसला भगदाड; 35 जण शिंदे सेनेच्या गळाला
महिलेचं तोंड दाबून गळ्यातले दागिने ओरबाडले, पतीच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार
इंग्रजीत बोलल्यामुळे वाद? महिला प्रवाशावर चालकाचा हल्ला, व्हिडिओ व्हायरल