महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा

कोल्हापुरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठाची महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला वनताराकडं सुर्पूत केल्यानंतरही नांदणी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. कोल्हापुरच्या(Kolhapur) शिरोळ तालुक्यातील नांदणी मठाची महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला वनताराकडं सुर्पूत केल्यानंतरही नांदणी परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये घेऊन गेल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी कालपासून शिरोळ तालुक्यात जिओ वर बहिष्कार घालण्यास सुरुवात केलीये..नांदणी पंचक्रोशीतील गावगावात जिओ सीम कार्ड पोर्ट करण्यास लोकांची गर्दी उसळीये..तर जिल्ह्यात आमदार सतेज पाटलांच्या नेतृत्वाखालीही सह्यांची मोहीम सुरू करण्यात आलीये.

दरम्यान कोणत्याही परिस्थितीत महादेवी हत्तीणीला परत आणणारचं असा निर्धार कोल्हापुरकरांनी (Kolhapur)केलायं..त्यासाठी एक रविवार महादेवीसाठी मोहीम राबविण्यात येणार असून येत्या रविवारी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत आत्मक्लेश मूक मोर्चा काढण्याण आहे..यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येणार असल्याचं माजी खासदार राजूशेट्टी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

दिवसभरात राहाल कायमच उत्साही! सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा Poha Nuggets, नोट करून घ्या रेसिपी
शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई; दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक
परभणी-संभाजीनगर दरम्यानचे अंतर कमी होणार; रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी 2179 कोटींची मंजूरी