विदर्भातील दक्षिण भागात पावसाची काहीशी उघडीप; पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीतच

गडचिरोलीतील काही मार्ग बंदच आहेत. पावसाने ब्रेक घेतल्याने शेतकरी(farmers) पुन्हा जोमाने रोवणीच्या कामाला लागला असल्याचे चित्र दिसून येत आहे.


विदर्भातील दक्षिण भागात पावसाची काहीशी उघडीप; पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीतच
विदर्भातील दक्षिण भागात पावसाची काहीशी उघडीप; पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीतच

गडचिरोली : गेल्या पाच दिवसांपूर्वी गडचिरोलीसह विदर्भातील(farmers) अनेक जिल्ह्यात संततधार पाऊस होताना दिसून आला. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने या भागात पूरस्थिती कायम असल्याचे दिसून आले.

गडचिरोलीतील काही मार्ग बंदच आहेत.(farmers) पावसाने ब्रेक घेतल्याने शेतकरी पुन्हा जोमाने रोवणीच्या कामाला लागला असल्याचे चित्र दिसून येत आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून काहीशी उसंत घेतली असल्याने जिल्ह्यातील पूरस्थिती काही अंशी ओसरताना दिसून येत आहे.

पूरस्थितीमुळे हजारो हेक्टर शेतपीक पाण्याखाली आले होते. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, पूर ओसरू लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रोवणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नदी, नाले ओसंडून वाहत असल्याने या भागातील अनेक मार्ग बंद असल्याने वाहतूक सेवा प्रभावित झाली आहे.

पावसामुळे अनेक मार्ग बंद

पावसाने दोन दिवसांपासून उसंत घेतली असली तरी जिल्ह्याच्या दक्षिण भागातील नदी, नाले तुडूंब भरून वाहत असल्याने या भागातील पूरस्थिती हळूहळू नियंत्रणात येताना दिसत आहे. मात्र, अद्यापही सिरोंचा असर अली-जगदलपूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जड वाहनांसाठी बंद आहे. यासोबतच अहेरी-वट्रा, भेंडाळा-बोरी-गणपूर, चामोर्शी-मार्कंडादेव, चपराळा-चौडमपल्ली सदर मार्ग बंद असल्याने या भागातील वाहतूक सेवेवर काही प्रमाणात झळ बसली आहे.

हेही वाचा :

रक्षाबंधनाआधीच बहिणीचा अक्राळविक्राळ चेहरा, भावाचा गळा दाबून…

महाराष्ट्र मंत्रिमंडळात ‘वाईल्ड कार्ड’ एन्ट्रीची शक्यता! शिंदेंकडून ‘मास्टरस्ट्रोक’, अजित पवार गटाला धक्का?

जैन समाजाचे एकत्रित आवाहन – JIO चा बहिष्कार करून माधुरीसाठी न्याय मागा