मुंबई: राज्य सरकारने मुलींच्या शिक्षणाला(education) प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘मुलींसाठी मोफत शिक्षण योजना’ लाँच केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाणार आहे. या योजनेची अधिक माहिती आणि सहाय्यासाठी सरकारने एक हेल्पलाइन सेवा देखील सुरू केली आहे.
या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण मिळवण्यासाठी आवश्यक ती आर्थिक मदत आणि मार्गदर्शन पुरवणे आहे. राज्यभरातील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतील, आणि नव्याने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज कसा करावा, याबद्दल माहिती मिळवू शकतात.
शासनाच्या या उपक्रमाचे विविध स्तरांवरून स्वागत होत आहे, आणि या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणात लक्षणीय वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप: नाशिकमध्ये उद्या शाळांना सुट्टी जाहीर
मुसळधार पावसात शेतकऱ्यांना ‘PM मोदी छत्री योजना’चा आधार: केंद्र सरकारची नवी योजना जाहीर
लाडकी बहीण’वर केलेले वक्तव्य केवळ विनोद होते ;रवी राणा यांचे स्पष्टीकरण