दिवसभरात राहाल कायमच उत्साही! सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा Poha Nuggets, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पोह्यांचे नगेट्स बनवू शकता.(breakfast) नेहमीच कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. जाणून घ्या पोहा नगेट्स बनवण्याची रेसिपी.

दिवसाची सुरुवात आनंदी आणि उत्साही करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता(breakfast) करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. अनेक लोक सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळतात. वजन वाढेल की काय अशी भीती अनेकांच्या मनात असते, ज्यामुळे नाश्ताच केला जात नाही. मात्र असे न करता सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नेहमीच नाश्ता कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पोहा नगेट्स बनवू शकता. पोहे पचनासाठी अतिशय हलके असतात. तसेच पोहे खाल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. पोह्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया पोहा नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी.

साबुदाण्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट(breakfast) राजगिऱ्याची खीर, चवीसोबतच पचनक्रिया राहील निरोगी

साहित्य:
पोहे
बटाटा
मीठ
कोथिंबीर
आलं लसूण पेस्ट
हिरवी मिरची
तांदळाचे पीठ
लाल तिखट
जिऱ्याची पावडर
तेल
सर्दी खोकला कायमचा पळेल दूर! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा झणझणीत मसालेदार सूप

कृती:
पोहा नगेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, पोहे स्वच्छ साफ करून पाण्यात काहीवेळ भिजत ठेवा. ५ मिनिटांनंतर पोह्यातील पाणी काढून टाका.
मोठ्या बाऊलमध्ये भिजवलेले पोहे, मॅश केलेला बटाटा, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची टाकून व्यवस्थित मिक्स करा.
नंतर त्यात तांदळाचे पीठ, चमचाभर बेसन आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर
त्यात जिऱ्याची पावडर, चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे नगेट्स बनवून कढईमधील गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्या.
तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पोह्यांचे नगेट्स. हा पदार्थ सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

हेही वाचा :

अमेरिकेचा भारताला आणखी एक मोठा झटका… 
इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद यशस्वी
सरकारी शाळेत शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! 7 हजार 466 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?