बटाटा आणि भेंडी भारतीय नाहीत! मग आपल्या ताटात आल्या कुठून? वाचा खरा इतिहास!

आपलं जेवण बटाटा, टोमॅटो, भेंडी, मिरची यांच्याशिवाय अपुरं वाटतं. (Potato)उत्तर भारतात आलू पराठा, दक्षिणेत टोमॅटो सांबार, पश्चिमेत भेंडी मसाला, पूर्वेत मिरचीचं लोणचं, या भाज्या आपल्या ताटात चव देतात. पण थांबा, या भाज्या खरंच भारतीय आहेत का? नाही! या सगळ्या परदेशातून भारतात आल्या आणि आपल्या जेवणाचा अविभाज्य भाग बनल्या. चला, या भाज्यांचा मूळ उगम आणि भारतातला प्रवास जाणून घेऊ.

बटाटा: बटाटा सगळ्यांना प्रिय आहे. पण बटाटा मूळचा दक्षिण अमेरिकेतला आहे. पेरू आणि बोलिव्हियात सात हजार वर्षांपासून बटाट्याची शेती होत आहे. भारतात सतराव्या शतकात पोर्तुगाल व्यापाऱ्यांनी बटाटा आणला. आज भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा बटाटा उत्पादक देश आहे.

टोमॅटो: टोमॅटो मूळचा मध्य आणि दक्षिण अमेरिकेतला आहे. मेक्सिकोत हजारो वर्षांपासून टोमॅटो उगवत आहे. सतराव्या शतकात पोर्तुगाली लोकांनी टोमॅटो भारतात आणला. (Potato)सुरुवातीला लोक याला विषारी समजायचे. त्याला “लव्ह अ‍ॅपल” म्हणायचे. पण अठराव्या शतकापासून टोमॅटो आपल्या स्वयंपाकात रुजला. आता भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा टोमॅटो उत्पादक देश आहे.

भेंडी: आज मसाला भेंडी किंवा भरली भेंडी अनेकांचा जीव की प्राण आहे. पण भेंडी मूळची पूर्व आफ्रिकेतली आणि इथिओपियातली आहे. चार हजार वर्षांपासून तिथे भेंडी उगवत होती. बाराव्या शतकात बंटू जमातींमार्फत भेंडी भारतात आली, असं मानतात. भेंडीच्या असलेल्या पौष्टिक गुणामुळे ती खास आहे. भारत आज जगात सर्वात जास्त भेंडी उगवणारा देश आहे.

मिरची- मिरची शिवाय भारतीय जेवणाला चवच नाही. पण मिरची मूळची मेक्सिकोतली आहे. सहा हजार वर्षांपासून तिथे मिरचीची शेती होत होती. (Potato) पंधराव्या शतकाच्या शेवटी पोर्तुगाली व्यापारी वास्को द गामाने मिरची भारतात आणली. त्याआधी आपण काळी मिरी आणि आलं वापरायचो. मिरचीमुळे भारतीय पदार्थांना तिखट चव मिळाली. आज भारत जगात सर्वात जास्त मिरची उगवतो आणि निर्यात करतो.

बीन्स: फ्रेंच बीन्स गेल्या काही वर्षांत आपल्या भारतीय स्वयंपाकात रुळलेली आहे. पण बीन्स मूळची मध्य आणि दक्षिण अमेरिकेतली आहे. पाच हजार वर्षांपासून तिथे बीन्स उगवत होती. सतराव्या शतकात पोर्तुगाली आणि स्पॅनिश व्यापाऱ्यांनी बीन्स भारतात आणली. याच्या कुरकुरीत चवीमुळे आणि पौष्टिकतेमुळे ती लोकप्रिय झाली.

फ्लॉवर: फ्लॉवर मूळची भूमध्य सागरातली भाजी आहे. १८२० च्या सुमारास ब्रिटिशांनी ती भारतात आणली. आलू-गोभी, गोभी मंचुरियनसारखे पदार्थ आता सगळ्यांना आवडतात.

पालक: पालक मूळचा मध्य आशियातला. पालक पनीर, पालक पराठा यामुळे तो आपल्या जेवणात महत्त्वाचा आहे. यात आयरन भरपूर आहे.

कोबी: कोबी ब्रिटिश काळात यूरोपातून भारतात आली. कोबी थोरन किंवा गोभी मंचुरियन यामुळे ती प्रसिद्ध आहे.

शिमला मिरची: शिमला मिरची मूळची मध्य अमेरिकेतली. पुर्तगाली लोकांनी ती भारतात आणली. यामुळे पदार्थांना रंग आणि गोड चव मिळते.

बीट: बीट मूळचा भूमध्य सागरातला. सॅलड, सूप किंवा मिठाईत याचा वापर होतो.

या भाज्या भारतात कशा रुजल्या?
या परदेशी भाज्या भारतात आल्या तेव्हा लोकांनी लगेच स्वीकारल्या नाहीत. पोर्तुगाली, स्पॅनिश आणि ब्रिटिश व्यापाऱ्यांनी सतराव्या ते अठराव्या शतकात या भाज्या आणल्या. भारताच्या विविध हवामानाने या भाज्यांना उगवायला मदत केली. स्थानिक शेतकऱ्यांनी याच्या नव्या जाती विकसित केल्या. भारतीय मसाल्यांनी या भाज्यांना नवं रूप दिलं.

हेही वाचा :

आला तर सोबत नाहीतर तुमच्याविना… संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या

मोठी बातमी ! अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? शिंदे गटाच्या नेत्याचे संकेत