आपण प्रत्येकाने फीट राहावं अशी सर्वांची इच्छा असते.(Keeping)सध्या लोकं फीटनेसच्या बाबतीत फार जागरूक झाले आहेत. अशातच जीममध्ये जाणाऱ्यांची संख्याही वाढलीये. फीटनेससाठीचा नवा प्रवास सुरु करताना पहिल्यांदा जिममध्ये येणं उत्साही पण थोडे गोंधळात टाकणारं ठरू शकतं. यासाठीच आज तज्ज्ञांनी आपल्याला पहिल्यांदा जीममध्ये जाणाऱ्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत याची माहिती दिलीये.

जीममध्ये गेले की बऱ्याचजणांना वाटतं, की एकदम भारी वर्कआउट करायला सुरुवात करावी. पण असं करणं चुकीचं आहे. तिथे जे ट्रेनर असतात, तेच योग्य मार्गदर्शन करू शकतात. ते तुम्हाला तुमच्या शरीराला योग्य अशा व्यायामाची सवय लावतील. VLEGENDS जीमचे कोच अश्विन भंडारी यांनी सांगितलं की, अनेक सदस्य सोशल मीडियावर पाहिलेले कठीण व्यायाम प्रकार करताना दिसतात. मात्र त्यांची पद्धत योग्य नसते किंवा ते त्यांच्या शरीराला मानवत नाहीत.
सोशल मीडियावरचे वर्कआउट्स नक्कल करू नका
इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर फिटनेस इन्फ्लुएन्सर्स जे दाखवतात, ते पाहून बऱ्याच जणांना वाटतं की आपणसुद्धा ते करू शकतो. पण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. (Keeping)सुरुवातीला अशा व्यायाम प्रकारांमुळे दुखापत होऊ शकते. म्हणून आधी ट्रेनरचा सल्ला घ्या आणि तुमच्या शरीराला शोभेल असाच व्यायाम करा.
शिस्त आणि स्वच्छता गरजेची
सर्व सदस्यांनी जिममध्ये शिस्त पाळणं आवश्यक आहे. आपण वजन उचलल्यानंतर ती परत जागेवर ठेवणं, उपकरण वापरल्यावर स्वच्छ करणं, इतर सदस्यांच्या वैयक्तिक जागेचा आदर करणं आणि मोठ्याने बोलणं किंवा गोंगाट टाळणं ही सर्व जबाबदाऱ्या पाळाव्यात. त्याचप्रमाणे टॉवेल आणणं, योग्य जिम ड्रेस घालणं या गोष्टी केवळ सभ्यतेचा भाग नाहीत तर आरोग्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
आरोग्यविषयक माहिती लपवू नका
जर तुम्हाला मधुमेह, बीपी, अस्थमा, पाठदुखी अशा कुठल्याही समस्या असतील, तर त्या तुमच्या ट्रेनरला नक्की सांगा. त्यामुळे ते तुमच्यासाठी योग्य अशा व्यायामाची योजना बनवतील आणि तुम्हाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
सामान्य गैरसमज दूर करा
पहिल्यांदा जीम जाणाऱ्या बऱ्याच लोकांना वाटतं की खूप घाम गाळल्याशिवाय व्यायामाचा काही उपयोग होत नाही. किंवा वजन उचललं की लगेच बॉडीबिल्डर होतो. हे सगळं चुकीचं आहे. (Keeping)व्यायामाचा उद्देश शरीर तंदुरुस्त ठेवणे असतो, बॉडी बनवणं नव्हे. योग्य व्यायाम, योग्य खाणं आणि पुरेशी विश्रांती – हे तिन्ही गरजेचं आहे.जिममध्ये पहिल्यांदा येताना शिकण्याचा दृष्टीकोन असावा. व्यायामात झपाट्याने यश मिळवण्याच्या नादात चुकीच्या पद्धती अवलंबू नयेत. तुमच्या ठराविक जीममधील मॅनेजमेंट सर्व नव्या सदस्यांना ओरिएंटेशन सत्र घेण्याचा सल्ला देतं.
हेही वाचा :
लवकरच बंद होणार Windows 10 चा सपोर्ट! भारत सरकारने जारी केला अलर्ट
ऋषभ पंतने जडेजाच्या निवृत्तीवर उडवली खिल्ली, सोशल मिडीयावर Video Viral
बाप आहे की हैवान ! बाळाला रस्त्याच्या मधोमध फेकले अन्…; हृदय पिळटवून टाकणारा Video Viral