‘महादेवी हत्तीणी’ला मिरवणुकीने नेत असताना पोलिस गाड्यांवर दगडफेक, नांदणीत तणाव

रात्री साडेअकराच्या सुमारास ‘महादेवी हत्तीणी’ला मिरवणुकीने नेत असताना(stones) काही तरुणांनी दोन पोलिस गाड्यांवर दगडफेक केली व प्रचंड घोषणाबाजी सुरू केली.

नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी(stones) संस्थान मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता. २८) फेटाळल्याने ‘महादेवी’ हत्तीण गुजरातमधील वनतारा हत्ती केंद्राकडे पाठवण्यावर शिक्कामोर्तब झाले. रात्री साडेअकराच्या सुमारास ‘महादेवी हत्तीणी’ला मिरवणुकीने नेत असताना काही तरुणांनी दोन पोलिस गाड्यांवर दगडफेक केली व प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. यात काही जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी हत्तीणीला निशिदीकेजवळ नेले. रात्री सव्वाबारा वाजता ‘ॲनिमल ॲम्बुलन्स’मधून महादेवी गुजरातच्या केंद्राकडे रवाना झाली.

नांदणी येथील प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी(stones) संस्थान मठाच्या ‘महादेवी हत्तीण’ प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा प्रश्न असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले होते. त्यानुसार नांदणीच्या महादेवी या हत्तीणीला गुजरात येथे दोन आठवड्यांत पाठविण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात मठ संस्थानने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन हत्तीण नांदणी मठाकडेच राहण्यासाठी आठवड्यापूर्वी याचिका दाखल केली होती.

मात्र, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम राखल्याने महादेवीला वनतारा केंद्रात पाठवण्याची तयारी नांदणीत सुरू झाली. प्रथम ‘महादेवी’चे पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गांवरून तिची मिरवणूक सुरू झाली. भरत बँकेजवळ मिरवणूक आली असता, काहींनी प्रचंड घोषणाबाजी करत दगडफेकीला सुरुवात केली. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामिनीं केलेल्या आवाहनानंतर शांततेत सुरू असणाऱ्या मिरवणुकीला गालबोट लागले.

तळ हाताच्या फोडासारखे जपलेल्या हत्तीणीला निरोप देताना महाराजांचे कंठ दाटले, महिलांना अश्रू अनावर; कधीच आयुष्यात विसरणार नाही…
अचानक सुरू झालेल्या धावपळीमुळे काही जण किरकोळ जखमी झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. अप्पर पोलिस अधीक्षक आप्पासाहेब जाधव घटनास्थळी दाखल झाले. पोलिस बळाचा वापर करून मिरवणुकीत हस्तक्षेप करत पोलिसांनी महादेवीला निशिदीकेकडे मार्गस्थ केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी जादा कुमक मागवल्यामुळे गावाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

‘महादेवी’च्या डोळ्यातूनही अश्रू!

सुमारे ३५ वर्षांपासून ‘महादेवी’चा नांदणी मठात वावर आहे. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच नांदणी व जयसिंगपूर शहर परिसरात या हत्तीणीचा वावर असतो. हत्तीणीला नेण्याची प्रक्रिया सुरू असताना निर्माण झालेल्या गोंधळात खुद्द ‘महादेवी’च्या डोळ्यातून देखील अश्रू ढळू लागल्याने पाहणाऱ्यांच्याही अश्रूंचा बांध फुटला.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य आहे. न्यायालयाच्या निकालाचा अवमान आमच्याकडून होणार नाही.

हेही वाचा :