शुभांशूची अवकाश भरारी ; अ‍ॅक्सिओम-4 अंतराळात झेपावले

आजचा दिवस भारताच्या अंतराळ (space)इतिहासातील सुवर्णक्षण आहे. भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी अमेरिकेच्या स्पेसएक्स आणि अ‍ॅक्सिओम स्पेस यांच्या Axiom-4 (Ax-4) मोहिमेअंतर्गत अंतराळात झेप घेतली आहे. ही मोहीम भारतासाठी विशेष आहे. शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत.

या मोहीमेचे प्रक्षेपण अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधूमन करण्यात आले. या मोहीमेसाठी शुंभाशू शुक्ला आणि त्यांच्या टीमने स्पेसएक्सच्या फाल्कन-९ या रॉकेटने उड्डाण केले. या मोहीमेसाठी शुभांशू शुक्ला २९ मे रोजी उड्डाण घेणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही मोहीम लांबणीवर पडली होती. अखेर बुधवारी (२५ जून) शुभांशू शुक्ला यांच्यासह ४ अंतराळवीरांनी(space) अवकाशात झेप घेतली आहे.

Axiom-4 ही मोहीम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राकेश शर्मा यांच्यानंतर शुभाशूं शुक्ला या मोहीमेचे प्रतिनिधीत्व करणार पहिले भारतीय ठरले आहेत. भारताच्या अंतराळातील वाढती ताकद आणि जागतिक सहकार्याचे प्रतीक म्हणून या मोहीमेकडे पाहिले जात आहे. या मोहीमेसाठी शुभांशू शुक्ला पायलट म्हणून काम पाहणार आहेत.

हेही वाचा :

मध्यपूर्वेतील संघर्ष थांबला शस्त्र संधी कायमची टिकेल?

महाराष्ट्रातील ‘या’ 8 जिल्ह्यात सुरू होणार सी-प्लेनची सुविधा

कनवाड येथे कृष्णा नदीच्या पुराने वाहून गेलेल्या ११ एकर शेतीची आमदार यड्रावकर यांच्याकडून पाहणी – तातडीने पंचनाम्याचे आदेश