उघड्यावर भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यासंदर्भातील विषयासंदर्भात(dogs) सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने अशाप्रकारे उघड्यावर कुत्र्यांना खायला घालण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील सोसायटीमध्ये कुत्र्यांना खायला घालण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. ‘तुम्ही तुमच्या घरात एक निवारा गृह उघडावे आणि तिथे कुत्र्यांना खायला द्यावे,’ असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

कोणासमोर झाली ही सुनावणी?
न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, खंडपीठाने प्राणीप्रेमींबद्दल बोलताना, “या मोठ्या मनाच्या लोकांसाठी प्रत्येक गल्ली,(dogs) प्रत्येक रस्ता का खुला करू नये! जिथे फक्त प्राण्यांनाच परवानगी असेल, तिथे माणसांसाठी जागा राहणार नाही,” असं उपाहासात्मक विधान केलं. पुढे प्राणीप्रेमींना सवाल करताना सर्वोेच्च न्यायालयाने, “तुम्ही तुमच्या घरात या कुत्र्यांना का खायला घालत नाही? हे करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखत नाहीये,” असं म्हटलं.
याचिकाकर्त्याचं म्हणणं काय?
या प्रकरणात, याचिकाकर्त्याने म्हटले आहे की कुत्र्यांना खायला घालताना तिला त्रास होत होता. समाजातील प्राण्यांच्या जन्म नियंत्रण नियमांनुसार, कुत्र्यांना खायला घालण्यासाठी एक निश्चित जागा(dogs) असावी. खरं तर, प्राणी जन्म नियंत्रण नियमांचा नियम क्रमांक 20 हा भटक्या कुत्र्यांना खायला देण्याशी संबंधित आहे. त्यात असे म्हटले आहे की, त्यांच्या परिसरात राहणाऱ्या भटक्या कुत्र्यांना जेवण देण्याची आवश्यक व्यवस्था करणे ही रहिवासी कल्याण संघटना, अपार्टमेंट मालक संघटना किंवा स्थानिक संस्थेच्या प्रतिनिधींची जबाबदारी आहे.
वकीलाने काय म्हटलं?
वकीलाच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की ही व्यवस्था ग्रेटर नोएडामध्ये नगरपालिकेने केली आहे परंतु नोएडामध्ये नाही. ज्या ठिकाणी लोक वारंवार भेट देत नाहीत अशा ठिकाणीही अन्न पुरवण्यासाठी नियुक्त केले जाऊ शकते.
सकाळी घराबाहेर पडल्यानंतर…
वकीलाचं विधान ऐकून खंडपीठाने, “तुम्ही सकाळी सायकलिंगसाठी बाहेर जा. तुम्हाला काय दिसते ते पहा. भटक्या कुत्र्यांमुळे केवळ सकाळी फिरायला जाणाऱ्यांनाच नाही तर सायकलस्वार आणि दुचाकीस्वारांनाही धोका आहे,” असं म्हटलं. तथापि, न्यायालयाने ही याचिका आधीच प्रलंबित याचिकेसह एकत्रित केली आहे.
देशभरात भटक्या कुत्र्यांचा त्रास
भटकी कुत्री आणि त्यांचे लाड करणारे प्राणीमित्र हे कायमच चर्चेचा विषय ठरतात. भटक्या कुत्र्यांकडून केले जाणारे हल्ले, रात्री अपरात्री प्रवास करताना या कुत्र्यांमुळे जीव धोक्यात धरुन करावा लागणारा प्रवास अशा अनेक गोष्टी सर्वसामान्यांच्या चिंतेत भर घालत असताना नव्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमकेबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे.
हेही वाचा :
महेंद्रसिंग धोनीचा हा शर्ट आहे iPhone पेक्षाही महाग, किंमत ऐकाल तर हैराण व्हाल
उत्तराखंडला टक्कर देणारे महाराष्ट्रातील छुपं पर्यटनस्थळ! सातपुडा पर्वत रांगेतील तोरणमळा
समोसा-जलेबीवरही ‘सिगारेटसारखी’ आरोग्य चेतावनी; नागपूरच्या दुकानांमध्ये लावले जाणार फलक