शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा सारंग लखाणी यांच्यासोबतचा विवाहसोहळा पार पडल्यानंतर दिल्लीमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देशातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली. पवार कुटुंबातील जवळपास सर्व सदस्य कार्यक्रमात दिसले, मात्र सुनेत्रा पवार यांच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण आले.

रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांच्या दिल्लीतील रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक प्रमुख राजकीय व्यक्तींनी हजेरी लावली. कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यात तब्बल 20 मिनिटे उपस्थित होते. (reception) यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यासोबत काही काळ संवादही साधला.
या कार्यक्रमात पवार कुटुंबातील सदस्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढला. रिसेप्शनमध्ये जवळपास संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसत असताना एका महत्त्वाच्या सदस्याची मात्र अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला उपस्थित नव्हत्या. विशेष म्हणजे अजित पवार यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवार कार्यक्रमाला आले होते. (reception) त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्या या कार्यक्रमाला का उपस्थित राहू शकल्या नाहीत, याचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही.
रेवतीच्या रिसेप्शननिमित्त पवार कुटुंबातील बहुतांश सदस्य एकत्र आले होते. त्याला केवळ सुनेत्रा पवार यांची अनुपस्थिती अपवाद ठरली. दुसरीकडे, या कार्यक्रमाला देशाच्या राजकारणातील अनेक प्रमुख चेहरे उपस्थित असल्याने रिसेप्शनला राजकीय रंगही मिळाला. अमित शाह यांनीही बराच वेळ कार्यक्रमात उपस्थित राहून रेवती आणि सारंग यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधताना दिसले. अमित शाह शरद पवार यांच्या शेजारी बसल्याचे फोटोही समोर आले आहेत.
विशेष म्हणजे राहुल गांधी रिसेप्शनमध्ये असतानाच अमित शाह तेथे पोहोचले. अमित शाह हे नवविवाहित रेवती आणि सारंग यांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर गेले, त्यावेळी राहुल गांधी खाली उपस्थित होते. दिवसभर विविध पक्षांतील बडे नेते या कार्यक्रमासाठी दिल्लीत दाखल झाले होते. सुप्रिया सुळे स्वतः रिसेप्शनमध्ये आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना दिसत होत्या. (reception) त्यामुळे हा सोहळा पवार कुटुंबासाठी कौटुंबिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरण्यासोबतच देशातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमुळेही चर्चेचा विषय ठरला.
हेही वाचा :
कोल्हापुरात लिंगायत समाजाचा एल्गार?