गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकपणे या सहभागी होणार असल्याची घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे केली. गडहिंग्लज तालुक्याचा समावेश दुष्काळी यादीत करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या २१ दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने गडहिंग्लज तालुका दुष्काळी यादीतून वगळण्यात आला आहे. (Raju Shetty) यामुळे तालुक्यातून संताप व्यक्त केला जात आहे.

गडहिंग्लज तालुक्याचा समावेश दुष्काळी यादीत करण्याचे मंत्री, आमदारांनी दिले असताना प्रत्यक्षात मंगळवारच्या दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत गडहिंग्लज, करवीर, हातकणंगले, कागल तालुक्याचे केवळ सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला आहे. (Raju Shetty) यामुळे गेली तीन आठवडे गडहिंग्लज येथे तालुका दुष्काळ सुरू करण्यासाठी आंदोलन करत असणाऱ्या सर्वपक्षियांचा अपेक्षाभंग झाला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे चंदगडचे सहयोगी आमदार शिवाजी पाटील असे दोन मातब्बर नेते गडहिंग्लज तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत असतानाही या तालुक्याची दुष्काळी होरपळ होत असल्याने महायुती शासनावर टीकेचा भडीमार होत आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांच्याकडून या दोन नेत्यांना आव्हान दिले जात आहे.
या पार्श्वभूमीवर आज राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्रियपणे सहभागी होणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.अत्यल्प आणि अनियमित पाऊस यामुळे पाण्याअभावी शेतात उभी असलेली खरीप पिके सुकून गेली आहेत,(Raju Shetty) तसेच आगामी रब्बी हंगामाच्या पेरण्यांवरही मोठे संकट निर्माण झाले आहे. विशेषतः डोंगरी भागात जनावरांच्या चाऱ्याचा आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. गडहिंग्लज तालुक्यात पावसाची मोठी तूट, भूजल पातळीत झालेली घट आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे हा तालुका दुष्काळी यादीत समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे बनले असल्याचे शेट्टी यांनी नमूद केले. या आंदोलनास भेट देवून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकपणे या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा :
अल्पवयीन मुलींना रात्री रस्त्यावर उतरवणे एसटी कर्मचाऱ्यांना भोवले बस चालक अन् कंडक्टर निलंबित
लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट