एसटी अन् दुचाकीचा भीषण अपघात, 2 जण ठार; भरधाव बसने दुचाकीला फरफटत नेलं

परभणी : राज्यातील अपघातांच्या(accident) घटनांची मालिका कमी होताना दिसून येत नाही. त्यात, महामंडळाच्या एसटी बसच्याही अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता, परभणी जिल्ह्यात एसटी बस आणि दुचाकीचा अपघात होऊन दोघांचा मृ्त्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

परभणीच्या पाथरी-सोनपेठ मार्गावरील जैतापूर वाडीजवळ आज बस आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली असून हा अपघात(accident) एवढा भीषण होता की दुचाकी ही बसच्या समोरील भागात अडकून अनेक फूट फरफटत गेल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर एसटी बस थेट शेतात जाऊन थांबली होती.

एस.टी. महामंडळ पाथरी आगाराची बस सकाळी पाथरीहून सोनपेठच्या दिशेने जात होती. पाथरी सोनपेठ रस्त्यावर जैतापूर वाडीजवळ या बसला अपघात झाला. त्यावेळी समोरून पाथरीकडे येणाऱ्या दुचाकी क्र. एम. एच. 22 ए.के. 1583 आणि बस क्र. एम. एच. 06 एस 8790 ची जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील लतिफ अहमद पठाण (वय 56) आणि शेख अनवर शेख नूर (वय 39 वर्षे) राहणार इंदिरानगर हे दोघेही जागीच ठार झाले आहेत.

अपघात इतका भीषण होता की, बसच्या पुढच्या भागात दुचाकी अडकला जाऊन बससोबत दुचाकी फरफटत पुढे गेली होती. अपघात होताच बस रस्त्याच्या कडेला एका शेतात जाऊन थांबली. सुदैवाने बस मधील कोणाला मार लागला नाही, पण दुचाकीवरील दोघांच्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप परभणी ग्रामीण कडून महारक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आलं होतं ज्यात परभणी ग्रामीणमध्ये तब्बल 18 ठिकाणी 1064 जणांनी रक्तदान केले आहे त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा काही अंशी दूर झाला आहे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले.

हेही वाचा :

बंगालमध्ये का टाळली जाते ही खास डाळ? कारण ऐकून थक्क व्हाल

खळबळजनक! ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल

शॉकिंग! रुग्णालयातील तरुणीला नशेखोर तरुणाकडून बेदम मारहाण; शिवीगाळ करत विनयभंग