३६० डिग्री फिरणारा पाळणा कोसळला, खांबाचे दोन तुकडे झाले अन् डोळ्यासमोर सारं संपलं; Viral Video

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.(degree) या व्हिडीओमध्ये अ‍ॅम्युझमेंट पार्कमधील एका राईडचा पाळणा मध्येच तुटून मोठी दुर्घटना झाल्याचे पाहायला मिळते. राईडमध्ये बिघाड झाल्याने त्याचे दोन तुकडे झाल्याने अपघातात किमान २३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यांपैकी तिघेजण गंभीररित्या जखमी असल्याचे म्हटले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा सौदी अरेबियाच्या तैफमधील एका अ‍ॅम्युझमेंट पार्कमधला आहे. या अ‍ॅम्युझमेंट पार्कच्या एका राईडमध्ये बिघाड झाला. राईड हवेत असताना अचानक त्याचे दोन तुकडे झाले. व्हिडीओमध्ये एका खांबावर पुढे-मागे झुलताना लोक राईडचा आनंद घेत असतात. अचानक मोठा आवाज होतो, राईड मध्यभागी तुटते आणि खाली कोसळले. त्यावर असलेले लोक देखील हवेतून खाली कोसळला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, राईडचा थांब वेगाने मागे पडला आणि विरुद्ध बाजूने उभ्या असलेल्या काहींना धडकला. राईड खाली कोसळताना त्यामध्ये बसलेल्या काहीजणांना दुखापत झाली.(degree) हा अपघात झाल्यानंतर सुरक्षा आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. एका बाजूला बचावकार्य सुरु असताना, दुसऱ्या बाजूला राईडमध्ये बिघाड का झाला याचा तपास सुरु झाला आहे.

अपघातामध्ये दुखापतग्रस्त झालेल्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. गंभीररित्या जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. (degree) या दुर्घटनेमध्ये २३ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

अमेरिकेचा भारताला आणखी एक मोठा झटका… 
इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद यशस्वी
सरकारी शाळेत शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! 7 हजार 466 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?