क्रीडा क्षेत्रातून एक वाईट घटना समोर आली आहे. सामन्यादरम्यान (match)एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. याने अनेकांना धक्का बसला आहे. बुधवारी अमेरिकेतील पिट्सबर्ग येथे बेसबॉल सामन्यादरम्यान एक 20 वर्षीय चाहता स्टेडियमच्या स्टँडवरून पडला. हा चाहता कवान मार्कवुड नावाचा माजी कॉलेज फुटबॉल खेळाडू असल्याचे सांगितची माहिती मिळत आहे. बुधवारी पिट्सबर्गमधील पीएनसी पार्क स्टेडियममध्ये पिट्सबर्ग पायरेट्स आणि शिकागो कब्स यांच्यातील मेजर बेसबॉल लीग 2025 सामना पाहण्यासाठी कवान मार्कवुड उपस्थित होता.

बेसबॉलच्या या सामन्यादरम्यान अचानक कवन मार्कवूडसोबत एक मोठा अपघात झाला. हा प्रकार अतिशय धक्कादायक होता. या सामन्यात(match) कवान मार्कवुड पिट्सबर्ग पायरेट्स संघाला चिअर करत होता.अँड्र्यू मॅककचेनने पिट्सबर्ग पायरेट्सला शिकागो कब्सवर 4-3 अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर लगेचच ही घटना घडली. या दरम्यान, कवन मार्कवुडने आनंद साजरा करायला सुरुवात केली, परंतु अचानक तो स्टेडियम स्टँडवरून पडला. कवन पडला त्या स्टँडची उंची सुमारे 21 फूट असल्याचे सांगितले जाते.
पिट्सबर्गच्या पीएनसी पार्क स्टेडियममधील स्टँडपासून सुमारे 21 फूट खाली पडल्यानंतर कवान मार्कवुडला गंभीर अवस्थेत स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. कवान मार्कवुडची प्रकृती अजूनही गंभीर आहे. हा मोठा अपघात होताच खेळ थांबवण्यात आला. कॅवन मार्कवुड जमिनीवर बेशुद्ध पडला होता. यानंतर, मैदानावर उपस्थित असलेल्या संघाने ताबडतोब कवान मार्कवुडला स्ट्रेचरवर ठेवले आणि त्याला अॅलेघेनी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कवन मार्कवुडवर उपचार सुरू होते आणि तो आयुष्याशी झुंज देत आहे.
Pirates fan falls pic.twitter.com/sgppriM24b
— Bobby K (@Bobbk_) May 1, 2025
कवान मार्कवुडची प्रकृती अजूनही गंभीर आहे. तो मृत्यूशी झुंज देत आहे. हा व्हायरल व्हिडीओ बघून चाहत्यांना धक्का बसला आहे. या व्हीओडीमुळे स्टेडियमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पिट्सबर्गच्या पीएनसी पार्क स्टेडियममधील अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे कोणतेही फुटेज जारी केलेले नसले तरी, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने घडलेली घटना उघड झाली आहे.
हेही वाचा :
सोनिया-राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; दिल्ली कोर्टाने दिले ‘हे’ निर्देश
सांगलीत धक्कादायक घटना: पतसंस्थेसमोर वृद्धाच्या हातून 40 तोळे सोने हिसकावले Video
अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेतलाच नाही; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं 2024 चं राज’कारण’