‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याला झालेला ब्रेन हॅमरेज, एकनाथ शिंदेंच्या पुढाकारामुळे कलाकाराने केली गंभीर आजारावर मात

अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि(hearts) सुप्रिया पिळगांवकर स्टारर ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. २००४ साली रिलीज झालेला ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट आजही चाहते तितक्यात आवडीने पाहतात. हा कॉमेडी चित्रपट मुंबई ते गणपतीपुळे बस प्रवासादरम्यान झालेल्या गंमतीमुळे चित्रपटाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. या बस प्रवासामध्ये एक कोकणी कुटुंब दाखवलं आहे. बस प्रवासात ऑनस्क्रिन बायकोसोबत प्रवास करणाऱ्या अभिनेता विकास समुद्रेने चाहत्यांचं मन जिंकलं. पण गेल्या काही वर्षांपासून विकास अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.

आज आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या(hearts) अभिनेता विकास समुद्रेचा वाढदिवस आहे. काही मोजकेच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारा हा अभिनेता फिल्म इंडस्ट्रीतून अचानक कसा गायब झाला ? हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकणारा विकास गेल्या काही वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. एका गंभीर आराजाशी झुंज लढत असल्यामुळे विकास फिल्म इंडस्ट्रीपासून दूर होता. मिळालेल्या माहितीनुसार, विकासला ब्रेन हॅमरेज सारख्या गंभीर आजारानं ग्रासलं होतं. २०१८ मध्ये अभिनेत्याला आजाराचं निदान झालं. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे उपचारांसाठी पैशांची चणचण देखील अभिनेत्याला भासत होती.

अभिनेत्याकडे आर्थिक चणचण असल्यामुळे त्याला मदतीचा हात म्हणून अनेकांनी मदत केली. (hearts) विकास या गंभीर आजारातून सुखरूप बाहेर पडला. यासाठी विकासला एकनाथ शिंदे यांनीही मोठी मदत केली होती. त्यानंतर आरामासाठी तो काही काळ मनोरंजनसृष्टी पासून दूर राहिला. त्यानंतर अभिनेत्याने संतोष पवार दिग्दर्शित ‘सुंदरा मनात भरली’ या नाटकातून दुहेरी भूमिका साकारत इंडस्ट्रीमध्ये दमदार पदार्पण केले. आजारपणाबद्दल अभिनेता एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता की, “आजारपणाचा काळ फार कठीण होता. अनेक गोष्टींना मी मुकलो‌. प्रकृतीच्या काळजीने अभिनयाबरोबरच दिग्दर्शक म्हणूनही रसिक सेवा करणार आहे. गेली 20-22 वर्ष प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले ते असेच असावे. रसिकांचे प्रेम आणि शुभेच्छांमुळेच मी पुन्हा उभा राहतो आहे.”

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..