रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना!

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख हा महाराष्ट्राचं आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. यात रितेश स्वतः छत्रपती शिवरायांची भूमिका साकारत असून तो या चित्रपटाचं(movie) दिग्दर्शन सुद्धा करतोय. मात्र या चित्रपटाचं शुटिंग सुरु असताना एका घटनेमुळे याला गालबोट लागलं आहे. साताऱ्यात माहुली संगममध्ये ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं शूट सुरु असताना रितेशच्या एका सहकलाकाराचा नदीत बुडून मृत्यू झाला. तब्बल 36 तासांनी अखेर त्याचा मृतदेह सापडला आहे.

दिग्दर्शक रितेश देशमुख(movie) आणि निर्माती जिनिलिया देशमुख यांचाय मुंबई फिल्म कंपनीकडून या घटनेविषयीचं अधिकृत निवेदन जाहीर केलं. यात त्यांनी म्हटले की, ‘संगम माहुली मंदिर, सातारा इथे आमच्या आगामी चित्रपटाचं शूट सुरु असताना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. दोन दिवसांचं शूटिंग निर्विघ्न पार पडलं होते. दुस-या दिवशीचे पॅकअप झाल्यानंतर, सगळे हॉटेलकडे परतण्याच्या तयारीत असताना काही कलाकार जवळच्या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले होते. ह्यामध्ये आमचा डान्स कलाकार सौरभ शर्मा हा देखील होता आणि दुर्दैवाने तो नदीपात्रात हरवला.

सदर बातमी समजताच, तातडीने अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख, निर्मात्या जिनेलिया देशमुख आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा हे संपूर्ण टीमसह तात्काळ नदीकाठी पोहोचले. सौरभ याला शोधण्यासाठी विनाविलंब स्थानिक पोहणा-यांची मदत घेण्यात आली आणि लगेच चित्रीकरणाच्या ड्रोनचा शोधकार्यसाठी वापर करण्यात आला. रितेश देशमुख यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून शोधमोहीम वेगवान करण्याची विनंती केली. सौरभच्या कुटुंबाशी आम्ही सतत संपर्कात आहोत आणि त्यांना संपूर्ण मदत करत आहोत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढील शुटिंग आम्ही स्थगित करत आहोत. सदर घटनेनंतर चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं.

अखेर 36 तासांनंतर सौरभ शर्माचा मृतदेह सापडला आहे. साताऱ्यातील शिवेंद्रराजे रेस्क्यु टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड ट्रेकर्स यांनी शोधमोहीम सुरु ठेवली होती. दरम्यान त्यांच्या या शोधमोहीमेला अखेर यश मिळालं. ज्यादिवशी ही घटना घडली त्याच दिवशी सौरभला शोधण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते मात्र अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली होती. नदी पात्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने सौरभ शर्माचा मृत्यू झाला असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली.

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून होती. हा चित्रपट म्हणजे रितेशच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. हा चित्रपट मराठीतील सर्वात बिग बजेट सिनेमा असणार अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत असून यात संजय दत्त, फरदीन खान, अभिषेक बच्चन सारखे कलाकार चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

हेही वाचा :

मोठी बातमी! सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांना अटक

Redmi च्या नव्या मॉडेलने सर्वांचेच वेधले लक्ष, बजेट किंमतीत ऑफर करते Premium Features

पहलगाम हल्ल्याचा मास्टरमईंड सैफुल्लाह कसुरीचा खळबळजनक खुलासा, व्हिडीओ तूफान व्हायरल!