अंगणात खेळत होता चिमुकला इतक्यात साप आला अन्…; थरारक VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तर काही व्हिडिओ(video) असे असतात जे पाहिल्यावर माणूस थक्क होऊन जातो. अनेकदा अंगावर काटा आणणारे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात.

सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ(video) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा अंगणात खेळत आहे. या दरम्यान अचानक त्याच्यासमोर एक मोठा साप येतो. धक्कादायक बाब म्हणजे हा साप फणा काढून मुलासमोर उभा राहतो. पण त्यानंतर जे घडते ते पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.

सापाला पाहताच भल्या भल्यांची घाबरगुंडी उडून जाते. पण लहान मुलांच्या मनात धोक्याची कल्पान नसते. अशा वेळी त्यांना भीती न वाटणे साहजिकच आहे. यामुळे चिमुकला त्या सापसोबत खेळू लागतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला अंगणात खेळताना दिसत आहे. तिथेच एक गाडी देखील उभी आहे. याच वेळी एक साप तिथे येतो.

साप चिमुकल्यासमोर फणा काढून उभा असतो. चिमुकला अजिबात घाबरत नाही.उलट तो सापाला हातात घेतो. त्याच्या मानेला पकडून त्याच्याशी खेळत असतो. चिमुकल्याने सापाला घट्ट धरलेले असते. साप बाळाच्या हातातून सुटताच चिमुकल्यापासून बाजूला होतो. चिमुकल्याने सापाला अगदी निर्धास्तपणे पकडलेले असते. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. अनेकजण हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत. तर काहींनी व्हिडिओ काढणाऱ्यावर संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @rajibul9078 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ हजारो लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्यच व्यक्त केले आहे. काही लोकांनी व्हिडिओ काढणाऱ्यावर टिका केली आहे. तर काहींनी मुलाच्या पालकांवर टीका केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, ‘व्हिडिओ काढण्यापेक्षा मुलाला सापापासून दूर करायला पाहिजे होते असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने काय वेडेपणा आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना!

Redmi च्या नव्या मॉडेलने सर्वांचेच वेधले लक्ष, बजेट किंमतीत ऑफर करते Premium Features

पहलगाम हल्ल्याचा मास्टरमईंड सैफुल्लाह कसुरीचा खळबळजनक खुलासा, व्हिडीओ तूफान व्हायरल!