मोठी बातमी! सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांना अटक

साकेत जिल्हा न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या(Social activist) मेधा पाटकर यांना अटक केली. मेधा पाटकर यांना दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. पाटकर यांच्या विरोधात न्यायालयाने दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्या अवमानप्रकरणी दंड ठोठावला होता.

परंतु पाटकर यांनी दंडाची रक्कम भरली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. पाटकर मात्र हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला होता. याच प्रकरणात मेधा पाटकर यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

अटक केल्यानंतर मेधा पाटकर(Social activist) यांना आजच साकेत न्यायालयात हजर करण्यात येईल. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंह यांनी 3 मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. मागील वर्षी मॅजिस्ट्रेट कोर्टाने 23 वर्षे जुन्या प्रकरणात मेधा पाटकर यांना दोषी ठरवले होते. या प्रकरणात त्यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि तक्रारदार व्हीके सक्सेना यांना 10 लाख रुपये मोबदला म्हणून द्यावेत असे निर्देश दिले होते.

हेही वाचा :

इचलकरंजी शहराच्या काळ्या ओढ्यात आढळला तरुणीचा सडलेला मृतदेह

महाराष्ट्रात घडू शकते पहलगामसारखी घटना? ‘या’ जिल्ह्यात 700+ पाकिस्तान्यांचं बेकायदेशीर वास्तव्य

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भयानक Photo Viral; जिकडे तिकडे मृतांचा सडा अन्…