राजकारणी आणि भोंदू बाबा यांची युती काही तुटत नाही!

पुरोगामीत्वाचा मुखवटा चेहऱ्यावर लावून अंधश्रद्धा निर्मूलनावर जोरात बोलणारे अनेक राजकारणी खाजगी आयुष्यात मात्र वास्तुशास्त्र, करणी धरणी, मंत्र तंत्र यावर विश्वास ठेवतात हे यापूर्वी अनेकदा पुढे आले आहे. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात आणि राजकारणी यांची मिली भगत महाराष्ट्राने नुकतीच पाहिली आहे. आता एका माजी खासदारावर त्यांच्याच सुनेने गंभीर आरोप केल्यानंतर ठाण्यातील फिरोज शेख या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. लोकप्रतिनिधी आपल्या घरात भोंदू बाबाला पाचारण करत असतील तर सामान्य माणसाची काय कथा?

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव या गावात अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर जी काही प्रकरणे उजेडात आली आहेत, (politicians) त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता आणि आहे. अजूनही हे प्रकरण संपलेले नाही. अगदी दोनच दिवसापूर्वी आणखी तीन गुन्हे यात भोंदू बाबा खरात वर दाखल झाले आहेत. खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे नाव पुढे आले तेव्हा खळबळ उडाली होती. त्यात त्यांचे राज्य महिला आयोग अध्यक्ष पदही गेले होते. त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या संपूर्ण प्रकरणावर एक चित्रपटही मोठ्या पडद्यावर येतो आहे. महाराष्ट्र फाईल असे या चित्रपटाचे नाव असून, या चित्रपटाच्या प्रदर्शनाला रूपाली चाकणकर यांनी हरकत घेतली आहे.

दीड दोन वर्षांपूर्वी कोकणातील एक मंत्री त्यांना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी त्यांनी घरातच अघोरी पूजा पाठ केला होता. त्याबद्दलचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या मंत्र्यांना खुलासा करताना नाकीनवआले होते. खरात प्रकरणातही महायुती मधील काही मंत्र्यांची नावे पुढे आली होती. तेव्हा त्यांचे धाबे दणाणले होते. अशोक खरात च्या नादी लागून अनेक राजकारण्यांनी मंत्र तंत्र विधी केले होते. अजितदादा पवार यांच्या बंगल्याच्या परिसरात भानामतीचे प्रकार याच दरम्यान झाले होते.नागराज मंजुळे यांचा “फॅन्ड्री”नावाचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. (politicians) त्यामध्ये मुलीला वश करण्यासाठी “काळया चिमणीची राख”हा फॉर्म्युला सांगितला होता.

सध्या छोट्या पडद्यावर “वशीकरणम”नावाची एक मालिका रोज प्रसारित केली जाते. मंत्र तंत्राशी संबंधित मालिका आणि सिनेमे येत राहिल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला काहीसा धक्का बसलेला आहे. आणि आता तर कायदेमंडळाचे सदस्य राहिलेले राजकारणीच अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले दिसतात.कोकणातील एक माजी खासदार आहेत. (politicians) त्यांच्या नगरसेवक असलेल्या मुलाच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. आपल्या सुनेला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यासाठी या माजी खासदारांनी फिरोज शेख या ठाण्याच्या भोंदू बाबाला सुपारी दिली होती. माजी खासदारांच्या सुनेने तक्रार केल्यानंतर या भोंदू बाबाला अटक केली आहे. एकूणच हे प्रकरण गंभीर अशासाठी आहे की ज्यांनी लोकांना कर्मकांडापासून दूर राहा असे प्रबोधन करायला हवे तेच लोक अंधश्रद्धेचा बाजार मांडत असतील तर सामान्य माणूस काय प्रेरणा घेणार?

माजी खासदाराच्या सुनेने केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, त्यांना गोमूत्र आणि हळद खायला दिली जात असे. भोंदू बाबा जे सांगत असे त्याप्रमाणे कृती केली नाही तर मारझोड केली जात असे. या माजी खासदारांच्या घरी सात वर्षे मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता असे त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. विविध राजकीय पक्षातील काही नेते हे व्यासपीठावरून शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतात.पुरोगामी विचारांची पखरण करतात. लोकांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये. करणी धरणीच्या फंदात पडू नये, कुणीतरी सांगताय म्हणून कर्मकांड करू नये. असे आवाहन करत असतात प्रत्यक्षात मात्र ते आपल्या खाजगी आयुष्यात अंधश्रद्धेलाच प्राधान्य देताना दिसतात. महाराष्ट्रात मंत्र तंत्र आणि जादूटोणा विरोधी कायदा आहे. पण त्याचे उल्लंघन राजकारणी, लोकप्रतिनिधी करत असतील तर, सामान्य माणसाची काय कथा?

हेही वाचा :

मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा?

चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट?

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसणार? 15 आमदार फुटणार?