बाप आहे की हैवान ! बाळाला रस्त्याच्या मधोमध फेकले अन्…; हृदय पिळटवून टाकणारा Video Viral

सध्या सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येते नाही. कधी मजेशीर, तर कधी भयावह घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच अलीकडच्या काळात माणूस अगदी हैवानासारखा वागत चालला आहे. अनेक अशा धक्कादायक घटना घडत आहे की या जगात माणुसकी आहे की नाही असा प्रश्न पडत आहे. सध्या एक अशीच माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा व्हिडिओ(video)सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

यामध्ये एक व्यक्तीने रस्त्याच्या मधोमध बाळाला फेकले आणि फरार झाला आहे. या घटनेने आसपासच्या लोकांना मोठा धक्का दिला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(video) तुम्ही पाहू शकता की, एक दुचाकीस्वार दोन चिमुकल्यांसह चाललेला असतो. तो अचानक अर्ध्या रस्त्यात थांबतो. त्याच्या पाठीमागे एक सहा-सात वर्षाचा चिमुकला बसलेला दिसत आहे.

तसेच त्याच्या पुढ्यात आणखी एक छोटे बाळ दिसत आहे. हा व्यक्ती त्या छोट्या बाळाला रस्त्याच्या मधोमध ठेवतो. त्यानंतर व्यक्ती पुन्हा आपली बाईक सुरु करतो आणि त्या चिमुकल्या बाळाला तिथेच सोडून निघून जातो. बाळा रांगायला लागते. याच वेळी आजूबाजुचे लोक येऊन त्या बाळाला उचलतात. आसपासच्या सर्वलोकांना या घटनेने धक्का बसतो. परंतु या क्रू कृत्याचा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ(video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @maharastrin_top_models या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि संतापजनक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने “औकात नसेल तर अस सोडू नका.” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, “मनाला खुप वाईट वाटल”. आणखी एका युजरने ” लोकांना नवस करूनही लेकरं होत नाहीत आणि हे निच लोक आपल्या पोटच्या गोळ्याला भर रस्त्यावर फेकून देतात, असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..