सांबा : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीची(district) घोषणा झाल्यानंतर राज्यभरात तिकीट वाटपावरून भाजपचे अनेक नेते नाराज आहेत. सांबा भाजपचे जिल्हाध्यक्ष कश्मिरा सिंह यांनाही तिकीट मिळाले नाही. अशा स्थितीत त्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला. कश्मिरा सिंह यांनी सांबा येथे पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली.
पत्रकार परिषदेत कश्मिरा सिंह यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांच्यावर (district)गंभीर आरोप करत त्यांना शेख अब्दुल्ला यांची विचारधारा भाजपमध्ये आणायची आहे, हे माझ्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना सहन होत नसल्याचे सांगितले.
माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी रक्त आणि घाम गाळून पक्षाला पाणी पाजले. मात्र, यावेळी नॅशनल कॉन्फरन्समधून आलेल्या सुरजितसिंग सलाठिया यांना उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सलाठिया यांचे तिकीट परत मिळेपर्यंत ते पक्षात परतणार नाहीत.
कश्मिरा सिंह म्हणाले की, जेव्हा राज्यात भाजपचा एकही आमदार किंवा खासदार नव्हता आणि कोणीही पक्षात सहभागी झाले नाही, तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्ष उभा राहिला. मी 40-42 वर्षे निःस्वार्थपणे पक्षाची सेवा केली. 30 वर्षांनंतर सांबा विधानसभा मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आहे. अशा स्थितीत पक्षासाठी वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्याला तिकीट द्यायला हवे होते’.
शेख अब्दुल्ला यांच्या पक्षाशी संबंधित असलेल्या व्यक्तीला तिकीट दिल्याने आता भाजप नेतृत्वाला कष्टकरी कार्यकर्त्यांची किंमत नसल्याचे स्पष्ट होते. 1996 पासून फक्त बाहेरील लोकांना तिकीट मिळाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यापूर्वी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीला (डीपीएपी) एक झटका बसला आहे. पहिल्या टप्प्यासाठी अर्ज दाखल केलेल्या 10 आझाद उमेदवारांपैकी चार जणांनी आपली नावे मागे घेतली आहेत. हा पक्षासाठी धक्का मानला जात आहे.
हेही वाचा:
तुमची सुरक्षा नको रे बाबा! असं का म्हणतात शरद पवार?
लाडकी बहीण योजना बंद होणार?; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
महाविकास आघाडीचे जोडो मारो आंदोलन सुरु, पवार-ठाकरेंसह कार्यकर्ते रस्त्यावर